येस बँकेचे राणा कपूर  यांची पेटीएमसोबत चर्चा 

येस बँकेचे राणा कपूर  यांची पेटीएमसोबत चर्चा 


मुंबई: प्रसिद्ध बँकर राणा कपूर येस बँकेतील आपली हिस्सेदारी पेटीएमला विकण्याची शक्यता आहे. खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर आता पेटीएमसोबत चर्चा करत आहेत. येस बँकेमध्ये राणा कपूर यांची 17.97 टक्के हिस्सेदारी आहे. राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबाची 9.64 टक्के आणि मधु कपूर आणि त्यांच्या कुटुंबाची (मुलगा गौरव आणि मुलगी शगुन) 8.33 टक्के हिस्सेदारी आहे. राणा कपूर दोन हजार कोटी रुपयांना हिस्सेदारी विकण्याची शक्यता आहे. 

राणा कपूर यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विट करून सांगितले होते की, ''मी कधीच एस बँकेचे शेअर विकणार नाही. कारण ते डायमंड सारखे आहेत.'' 

गेल्या काही महिन्यांमध्ये येस बँकेच्या शेअरमध्ये सतत घसरण सुरु आहे. परिणामी बँकेचे बाजारभांडवलात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. देशातील खासगी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची बँक असलेल्या येस बँकेने थकीत कर्जाबाबत अनियमितता केल्याचा ठपका ठेवत रिझव्‍‌र्ह बँकेने मात्र राणा कपूर यांना बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरून दूर करण्यात आले होते. बंधू अशोक कपूर यांच्या निधनानंतर 2004 पासून बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राणा कपूर यांनी पदभार सांभाळला होता. 

काल (सोमवार) मुंबई शेअर बाजारात येस बँकेचा शेअर 4.47 टक्क्यांनी वधारून 63.10 रुपयांवर व्यवहार करत बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे 16 हजार 092.46 कोटींचे बाजारभांडवल आहे. 

Web Title: Yes Bank's Rana Kapoor talks with Paytm

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com