'योगींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा'

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 डिसेंबर 2018

लखनौ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये पोलिस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्यासह दोन जणांची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नाही. त्यामुळे राज्यातील 83 माजी अधिकाऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली असून, या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. याबाबतचे पत्रकच त्यांनी जाहीर केले.  

योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याबाबतचे पत्रक ज्या अधिकाऱ्यांनी काढले, यामध्ये 83 अधिकारी 4-5 वर्षांपूर्वीच निवृत्त झाले आहेत. या पत्रकात त्यांनी सांगितले, की सुबोधसिंह यांच्या हत्येप्रकरणाचा तपास करण्याऐवजी चुकीच्या दिशेने याप्रकरणाचा तपास केला जात आहे, असा आरोप या अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच हिंसाचार भडकावणाऱ्या आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिस गोकशीच्या आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, बुलंदशहरमध्ये झालेला हिंसाचार भडकवणाऱ्या आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.  
 
Web Title: Yogi Adityanath should resign from UP CM

संबंधित बातम्या

Saam TV Live