#Yogi4PM पोस्टर लावणारे तिघे अटकेत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

लखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर लखनौमध्ये लागले असून, पोस्टर लावणाऱया तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.

लखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर लखनौमध्ये लागले असून, पोस्टर लावणाऱया तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.

उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या संघटनेने हे पोस्टर लावले असून, "योगींना आणा, देश वाचवा' असा संदेश त्यावर लिहिला आहे. सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी हे पोस्टर हटविले आहेत. शिवाय, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, हे फलक प्रिंट करणाऱ्यासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उन्नाव येथून सुमित पासी, बहरीच येथून इक्रमुद्दीन आणि लखनौ येथून मनिष अग्रवाल यांनी पोलिसांनी अटक केली आहे.  

"योगी आणा, देश वाचवा' या संदेशाच्या बाजूला #Yogi4PM हा हॅशटॅग दिला आहे. या पोस्टरमधून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली आहे. मोदींना जुमलेबाज ठरवण्यात आले असून, योगी हिंदुत्वाचे "ब्रॅंड आयकॉन' असल्याचे म्हटल आहे. अमित जानी नावाच्या व्यक्तीने हे पोस्टर लावले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर भर देऊन जोरदार प्रचार केला. मध्य प्रदेशातील एका सभेत योगींनी अली आणि बजरंग बली यापैकी एकाची निवड करा, असे मतदारांना आवाहन केले होते. हिंदुत्व बाजूला ठेवून विकासाचा मुद्दा उचलून धरल्यामुळे भाजपचा पराभव झाला, असे काही समर्थकांचे मत आहे. त्यांनी सोशल मीडियावरून तशी आपली नाराजीही प्रगट केली. निवडणुकीत विजयासाठी विकास आवश्‍यक आहे; पण तितके पुरेसे नाही. विकासाचा अभाव हिंदुत्वाने भरून काढता येऊ शकतो, असे राज्यसभेतील भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले.

Web Title: #Yogi4PM: Posters appear in Lucknow three arrested


संबंधित बातम्या

Saam TV Live