तुम्ही विमानाने मुंबईत येताय ! मग हे वाचाच 

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 26 मे 2020

 विमानतळ आणि विमानात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय प्रवासी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे.प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी विमानतळावर पुरेसा वैद्यकीय कर्मचारी वर्ग तैनात ठेवण्यात येणार आहे. विमानतळावर गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विमानतळाला वारंवार सॅनिटाइज करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

मुंबई: राज्य सरकारने  नियमावली जारी केली. त्यानुसार काही अटी घालण्यात आल्या आहेत. नियमावलीनुसार सर्व प्रवाशांना त्यांच्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू अॅप इन्स्टॉल करणं बंधनकारक आहे. त्याशिवाय हेल्थ प्रोटोकॉलचंही प्रवाशांना पालन करावं लागणार आहे. विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग झाल्याशिवाय कुणालाही आत किंवा बाहेर जाता येणार नाही. एखादा प्रवाशामध्ये करोनाची लक्षणे जाणवल्यास त्याला तात्काळ आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे.

 विमानतळ आणि विमानात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय प्रवासी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे.प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी विमानतळावर पुरेसा वैद्यकीय कर्मचारी वर्ग तैनात ठेवण्यात येणार आहे. विमानतळावर गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विमानतळाला वारंवार सॅनिटाइज करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांचे नाव, मोबाइल नंबर, त्याची येण्याची तारीख आणि वेळ नोडल अधिकाऱ्यांशी शेअर करण्यास एअरलाइन्स आणि एअरपोर्ट ऑथेरिटी ऑफ इंडियाला सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय विमानतळावर २४ तास हेल्प डेस्कही सुरू राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.मुंबईतूनही देशांतर्गत विमानसेवेला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबई रेड झोनमध्ये असल्याने करोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने मुंबईत विमानाने दाखल होणाऱ्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार विमानाने मुंबईत येणाऱ्यांना १४ दिवस सक्तीने होम क्वॉरंटाइन व्हावं लागणार आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारले जाणार आहेत. मात्र, मुंबईत कमी कालावधीसाठी येणाऱ्यांना १४ दिवसांच्या होम क्वॉरंटाइनच्या सक्तीतून सूट मिळणार आहे, पण त्यासाठी प्रवाशाला त्याची सर्व माहिती संबंधित विभागाला द्यावी लागणार आहे.

WebTitle:: You come to Mumbai by plane! Then read this

संबंधित बातम्या

Saam TV Live