तुम्ही उन्हात बाहेर पडताय ! मग हे वाचाच

तुम्ही उन्हात बाहेर पडताय ! मग हे वाचाच

नवी दिल्ली : पुढील दोन दिवस वायव्य भारत, मध्य भारत आणि पूर्वेकडील भारतातील लगतच्या अंतर्गत भागात वारे वाहतील. हवामान खात्याने आवाहन केले आहे की 'दुपारच्या वेळी सावध आणि सतर्क राहा, दुपारी १ ते सायंकाळी ५ दरम्यान बाहेर जाणे टाळा' हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भात २८ मे पर्यंत उष्णतेची तीव्र परिस्थिती असेल.

मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात ११ जून रोजी पाऊस येईल. नेहमीपेक्षा जास्त रेंगाळून ८ ऑक्टोबर रोजी त्याच्या परतीचा प्रवास सुरू होईल.हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, २८ मेच्या रात्रीपासून थोडा दिलासा मिळणार आहे. उष्णतेच्या लाटांचा तडाखा अद्यापही महाराष्ट्राला बसत असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथील कमाल तापमानाने ४५ अंशांचा आकडा गाठल्याने नागरिकांसाठी हे वातावरण तापदायक बनले आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ते २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे. 

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, २९-३० मे नंतर लोकांना थोडासा आराम मिळण्याची शक्यता आहे. पुढचे दोन दिवस म्हणजे २८ मे पर्यंत म्हणजे लक्षणीय बदल होण्याची अपेक्षा नाही. या आठवड्याच्या शेवटी हलका पाऊस होऊ शकतो.  मंगळवारी चूरू हे जगातील सर्वात दोन जागांमधील एक झालं ज्याठिकाणी सर्वात जास्त उष्णता आहे. याशिवाय पाकिस्तानमधील जेकबाबादचे तापमानही ५० अंश नोंदविण्यात आले.


राजधानी दिल्लीतील उष्णतेने गेल्या १८ वर्षातील विक्रम मोडला आहे. मंगळवारी ते ४७.६ डिग्री सेल्सियस होते. दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्त प्रदेशसह अनेक राज्यात उष्णतेचे पारा वाढणार आहे. अनेक राज्यात वाढलेल्या तापमानामुळे लोकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. राजस्थानच्या चुरू येथे ५० डिग्रीच्या वर तापमानाची विक्रमी नोंद झाली आहे. तर उत्तर प्रदेशच्या बांदा आणि प्रयागराजमध्ये तापमान ४८ डिग्री सेल्सिअस तापमान आहे.हरियाणामध्ये हिसारचा पारा देखील ४८ अंशांवर होता तर उत्तर प्रदेशातील बांदामध्येही समान तापमानाची नोंद झाली. 

WebTittle : You go out in the sun! Then read this

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com