सावधान ! तुमच्या आजूबाजूला असू शकतो लुटारुंचा घोळका

सूरज सावंत
मंगळवार, 8 जून 2021

मुंबईत एका अशा टोळीचा पर्दाफाश झाला आहे. जी लोकांना दिवसा ढवळ्या लुटत होती. हातचलाकी आणि बोलण्यात गुंगवून लाखोची संपत्ती क्षणात छुमंतर करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील 6 आरोपींना मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलनं अटक केली आहे.

मुंबई - मुंबईत Mumbai एका अशा टोळीचा पर्दाफाश झाला आहे. जी लोकांना दिवसा ढवळ्या लुटत होती. हातचलाकी आणि बोलण्यात गुंगवून लाखोची संपत्ती क्षणात छुमंतर करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी Mumbai Police पर्दाफाश केला आहे. या टोळीतील 6 आरोपींना Accused मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलनं property sell अटक केली आहे. तर त्यांच्याकडून 24 लाखांचे हिरे देखील हस्तगत करण्यात आले आहे. You may be surrounded by a robbers

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार; आरोपी टोळक्यानं वावरत होते. टोळक्यानं वावरत असताना ते आपलं सावज हेरत होते. असंच एका हिरे व्यापाऱ्याची सावज म्हणून या आरोपींनी निवड केली. आरोपींनी या आगोरद या हिरे व्यापाऱ्याच्या हालचालींवर नजर ठेवली होती. त्याची रेकी केली. हिरे व्यापारी लाखो किमतेचे हिरे घेवून ऑपेरा हाऊस येथे जात होता. त्यावेळी हे आरोपी घोळक्यानं हिरे व्यापारी जात असलेल्या बसमध्ये शिरले आणि हिरे व्यापाऱ्याला घेरून बसले.

पूर्व लडाखमध्ये चीनच्या हवाई दलाचा युद्धाभ्यास; भारताची चिंता वाढली  

या आरोपींपैकी एकानं  हिरे व्यापाऱ्याच्या शर्टावर किडा पडल्याची बतानवणी केली. हिरे व्यापारी शर्ट खराब झाला आहे का ?  याची पाहणी करण्यात गुंतला. हिरे व्यापाऱ्याचं लक्ष विचलित झाल्याचे कळताच. आरोपींपैकी एकानं हिरे व्यापाऱ्यानं पायाशी ठेवलेली बॅग उचलली आणि क्षणात लंपास केली. बॅग आपल्या ताब्यात अल्याचं कळताच आरोपींनी देखील काही वेळातच तिकडून पळ काढला.काही कळण्याच्या आताच आरोपी निसटले होते. हिरे व्यापाऱ्याला जेव्हा कळलं आपण गंडलो आहोत. तेव्हा त्यांनी थेट बोरिवली पोलिस स्टेशन गाठलं आणि आणि तक्रारीची नोंद केली.  You may be surrounded by a robbers

एप्रिल महिन्यात घडलेल्या घटनेचा तपास मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलनं दीड महिने केला. या प्रकरणात पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेजची मदत घेण्यात आली.  गुन्ह्यानंतर आरोपींनी मोबाईल फोन बंद करुन ठेवले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. यातील मुख्य आरोपी कल्याण पासून दूर आळेफाट येथे लपून बसला होता.

हे देखील पहा -

या आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली  त्यानंतर पोलिसांनी हाळू हाळू उर्वरित आरोपींना बेड्या ठोकल्या या प्रकरणात आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली असून अजून दोन ते तीन आरोपी असण्याची शक्यता आहे आणि त्यांचा शोध सुरु असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live