काँग्रेसने घेतला नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्धार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मुंबई - लोकसभेतील पराभवानंतर आगामी २०१९ मध्ये काँग्रेसने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्धार केला आहे. युवक काँग्रेसमधील नव्या युवा चेहऱ्यांना थेट लोकसभा व विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची योजना अध्यक्ष राहुल गांधी यांनी आखली असून, त्यासाठीची तयारीदेखील सुरू केली आहे. 

मुंबई - लोकसभेतील पराभवानंतर आगामी २०१९ मध्ये काँग्रेसने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्धार केला आहे. युवक काँग्रेसमधील नव्या युवा चेहऱ्यांना थेट लोकसभा व विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची योजना अध्यक्ष राहुल गांधी यांनी आखली असून, त्यासाठीची तयारीदेखील सुरू केली आहे. 

महाराष्ट्रात युवक काँग्रेसने ९ लोकसभा व ३५ विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी मागितली आहे. यासाठी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कृष्णा अलवर यांनी इच्छुक युवक पदाधिकाऱ्यांच्या वन टू वन मुलाखती घेतल्या. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सत्यजित तांबे यांनी स्वीकारल्यानंतर राज्यभरात युवक काँग्रेसने कात टाकल्याचे चित्र आहे. भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यावर युवक काँग्रेसने भर दिला असतानाच आता थेट निवडणुकीच्या मैदानात युवकांना संधी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.  

युवक काँग्रेसने लोकसभेसाठी रावेर ( केतकी पाटील ), नगर (सुजय विखे), दिंडोरी (नयना गावित), धुळे (हर्षवर्धन दहिते), ठाणे (निशांत भगत), चंद्रपूर (शिवा राव), शिर्डी (उत्कर्षा रूपवते), यवतमाळ (राहुल ठाकरे), तर उस्मानाबादमधून शरण पाटील यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. या सर्वांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. मात्र, उस्मानाबाद, नगर, ठाणे व दिंडोरी हे मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. दरम्यान, विधानसभेच्या ३५ मतदारसंघांतही युवक काँग्रेसला उमेदवारी हवी असून, या मतदारसंघांतील इच्छुकांच्याही मुलाखती घेतल्या आहेत. यात धीरज देशमुख (लातूर), जितेंद्र देहाडे (औरंगाबाद शहर), सत्यजित शेरकर (जुन्नर), जितेंद्र मोघे (आर्णी), हेमंत ओगले (श्रीरामपूर), राहुल दिवे (नाशिक मध्य) अशा काही प्रमुख युवक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. आगामी लोकसभा व विधानसभेत राहुल गांधी युवक काँग्रेसच्या नव्या चेहऱ्यांना निश्‍चित संधी देणार असून, त्यासाठीची तयारी सुरू केल्याचा दावा युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला आहे.

Web Title: Young brigade in Congress election


संबंधित बातम्या

Saam TV Live