शिर्डी-श्रीरामपूर येथे इंजिनीयर तरुणाचा म्युकरमायकोसिसने मृत्यू

Mucormicosis
Mucormicosis

शिर्डी : श्रीरामपूर Shrirampur येथे एका इंजिनिअर असलेल्या 27 वर्षीय तरुणाचा म्युकरमायकोसिस Mucormycosis या आजाराने मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसापासून त्याची मृत्यूशी झुंज चालू होती. या तरुणास गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी तो श्रीरामपूर येथे एका रुग्णालयातुन कोरोना उपचार घेऊन घरी गेला होता. Young engineer dies of mucormycosis in Shirdi Shrirampur

मात्र दोन दिवसानंतर त्याला अचानक त्रास होऊ लागल्याने, त्याला पुणे Pune येथील रुबी हॉस्पिटला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यास म्युकरमायकोसिसने आजार झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यात शंभर इंजेक्शनची गरज होती.

हे देखिल पहा

उपचारासाठी मदत म्हणून सोशल मीडियावर आव्हानही केले असता, अनेकांनी त्याला मदतही केली होती. त्याच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र काल त्यास जास्त त्रास होऊ लागल्याने उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com