देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवून युवा शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

साम टीव्ही ब्यूरो
मंगळवार, 1 जून 2021

मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा याठिकाणी एका युवा शेतकऱ्याने देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवून  विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  योगेश पाटील असे या  शेतकऱ्याचे नाव आहे.

जळगाव : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा याठिकाणी एका युवा शेतकऱ्याने देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवून  विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  योगेश पाटील असे या  शेतकऱ्याचे नाव आहे. देवेंद्र फडणवीस यांचा ताफा उचंदा परिसरातून जात असताना योगेश त्यांच्या ताफ्यासमोर आडवा झाला. त्याच्या हातात विषाची बाटली होती. तो विष प्राशन करणार इतक्यात पोलिसांनी  त्याच्या हातातून विषाची बाटली हिसकावून घेतली. (A young farmer tried to commit suicide by blocking the convoy of Devendra Fadnavis) 

योगेश विश प्राशन करण्याचे कारण काय? 
मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवेचा रहिवासी असलेल्या योगेशने आपल्या शेतात केळीचे पीक घेतले आहे. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाने त्याच्या शेतातील 20 हजार केळीच्या झाडांचे पूर्ण नुकसान झाले. गेल्या आठवड्यात झालेल्या पूर्व मोसमी पावसामुळे त्याच्या शिवारातील  20  हजार केळीच्या झाडांचे नुकसान झाले.   दोन दिवसांपूर्वी  जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील नुकसान ग्रस्त तालुक्यात पाहणी केली.  यावेळी त्यांनी प्रत्येक  शेतकऱ्याच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. परंतु, त्यानंतरही योगेश पाटील यांच्या  शेतातील नुकसणीचे पंचनामे झाले नाहीत.   त्यामुळे नेतेमंडळी बांधावर येऊन साधी पाहणी करायलाही तयार नसल्याची खंत व्यक्त करत योगेशने हा प्रकार केला.

 26 राज्यात कोरोनानंतर आता म्युकर मायकोसिसचा कहर !

गुलबराव  पाटील यांनी रस्त्यावरील शेतांची धावती पाहणी करून निघून गेले, मात्र आपल्या शेतात पाहणी केली नाही, ही पाहून योगेश चांगलाच संतापले होते. तर फडणवीस हेदेखील  फक्त फोटोसेशन करायला आले असून या दौऱ्यातून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही. असा आरोप केला. तसेच यापूर्वीही भाजप सरकारच्या काळात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. तर राज्यातील विद्यमान  महाविकास आघाडीचे सरकाही  निष्क्रिय आहे. शेतकऱ्याला एक रुपयाची देखील आर्थिक मदत मिळणार नसल्याचा आरोप करत त्याने आपला संताप व्यक्त केला. 

Edited By - Anuradha Dhawade 


संबंधित बातम्या

Saam TV Live