VIDEO | स्टंट करताना तरुणानं गमावला जीव

कल्पेश गोरडे साम टीव्ही कल्याण
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

लोकलच्या दरवाज्यात लोंबकळत असलेला हा स्टंटबाज...जीवावर उदार होऊन, जीवघेणा स्टंट करतोय.. दरवाज्यातून बाहेर लोंबकळत हा स्टंट करतोय...आपल्या स्टंटचे व्हिडीओ प्रवासी बनवतायत म्हटल्यावर याचा उत्साह अजून वाढला..

लोकलच्या दरवाज्यात लोंबकळत असलेला हा स्टंटबाज...जीवावर उदार होऊन, जीवघेणा स्टंट करतोय.. दरवाज्यातून बाहेर लोंबकळत हा स्टंट करतोय...आपल्या स्टंटचे व्हिडीओ प्रवासी बनवतायत म्हटल्यावर याचा उत्साह अजून वाढला..

दिलशान खान असं याचं नाव असून, 20 वर्षांचा दिलशान कल्याणचा रहिवासी आहे...हा लोकलच्या दरवाजात उभा राहून स्टंट करत होता...आपल्या भावाच्या लग्नाचे कपडे खरेदी करण्यासाठी गोवंडी येथे मित्रांसोबत गेला होता...तिथून परतताना दिवा आणि मुंब्र्याच्यामध्ये दरवाजात स्टंट करू लागला...काहीवेळ हा थरार अनुभवत असतानाच अचानक एका पोलला याची धडक झाली...आणि रक्तबंबाळ झालेला दिलशान जागीच मृत्यूमुखी पडला...हा सगळा जीवघेणा थरार त्याच्या मित्रानं मोबाईलमध्ये कैद केलाय....

 

 

अवघ्या 20 वर्षांच्या दिलशानला स्टंटबाजीमुळे जीव गमवावा लागलाय...काही दिवसांपूर्वीच दिलशानला चालक म्हणून नोकरी मिळाली होती...कमवायला लागल्याने भावी आयुष्याची अनेक स्वप्ने त्याने रंगविली होती...पण, त्याच्या एका चुकीपायी सर्व स्वप्ने धुळीस मिळालीयत...रेल्वेनं स्टंटबाजी रोखण्यासाठी जनजागृती केली...पण, त्याकडं दुर्लक्ष करून स्टंटबाज स्टंटबाजी करतात...त्यामुळं या स्टंटबाजाला आपला जीव गमवावा लागला...त्यामुळं तुम्ही असे स्टंट करू नका...

WebTittle :: Young lost life during stunt


संबंधित बातम्या

Saam TV Live