VIDEO | बायकोला मॅसेज करतो या संशयातून तरुणाला पाणी पाजून पाजून मारहाण, व्हिडिओ व्हायरल

साम टीव्ही
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

 

  • बायकोला मॅसेज करतो या संशयातून तरुणाला मारहाण
  • तरुणाला पाणी पाजून पाजून मारलं
  • तरुणाला थर्ड डिग्री लावणाऱ्या 6 जणांना अटक

बायकोला मेसेज करत असल्याच्या संशयातून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना मुंबईतल्या घाटकोपरमध्ये घडलीय. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आलीय. मुंबईसारख्या शहरात घडलेल्या तालिबानी कृत्यामुळं संताप व्यक्त केला जातोय.

मुंबईतल्या घाटकोपरच्या नॉर्थ बॉम्बे स्कूलजवळची ही छळछावणी पाहा.

 

सहा जण एका तरुणाला अमानुष मारहाण करतायत. पीडित तरुण आरोपीच्या बायकोच्या मोबाईल मॅसेज करतो असा आरोपीला संशय होता. या संशयावरुन आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी तरुणाला नॉर्थ बॉम्बे स्कूलजवळच्या निर्जन ठिकाणी बोलवलं. त्याला जमिनीवर पडेपर्यंत मारहाण केली. लाकडी दांडक्यानं त्याच्या पाठ सोलून काढली. तरुणाला पाणी पाजून पाजून मारहाण केली. आरोपीच्या बायकोला मॅसेज केला नाही असं सांगूनही त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं. उलट बोलल्यावर त्याच्या पाठीवर लाथाबुक्क्या बरसत होत्या. बराच वेळ तरुणाला मारहाण सुरु होती. हा सगळा प्रकार आरोपी मोबाईलमध्ये शूट करत होता. शूट केलेले हे व्हिडिओ मारहाणीनंतर व्हायरल करण्यात आले. हे व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहचल्यावर पोलिसांनी तरुणाला पोलीस ठाण्यात बोलावून ६ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय.

तरुण त्रास देत होता तर त्याविरोधात पोलिस ठाण्यात जाणं अपेक्षित होतं. पण कायदा हातात घेऊन थेट थर्ड डिग्री देणाऱ्या तालिबानी वृत्तीला ठेचून काढणं गरजेचं आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live