धक्कादायक! कोविड सेंटरमधून सुट्टी दिलेला तरुण दुसऱ्याच दिवशी पॉझिटिव्ह

beed hospital
beed hospital

बीड - कोविड केअर सेंटर covid care centre मधून सुट्टी दिलेला तरूण, दुसऱ्याच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह Corona आल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या Beed धारूर मध्ये उघडकीस आला आहे. एका चोरीच्या प्रकारातून हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळं धारूर अरोग्य विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा उघड झाला असून आरोग्य विभागाच्या Health Department उपचार पद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थीत केले जात आहे.  The young man discharged from the Covid Center was positive next day

बीडच्या धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घाटात झालेल्या चोरीच्या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले होते.त्यांना काल शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार होते.त्यामुळं आरोपींची कोविड टेस्ट करण्यात आली.

या कोविड टेस्टमध्ये ज्या तरुणाला 3 तारखेला कोवीड सेंटर मधून सुट्टी देण्यात आली होती, तोच तरूण काल म्हणजे 4 तारखेला कोरोना बाधित आढळून आला आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागांच्या उपचार पद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत.

सुट्टी देण्या पूर्वी रूग्णांची सर्व तपासनी करणे गरजेचे असते.परंतू असे काही न करता सुट्टी देत असल्याचे प्रकार घडत आहेत.आरोग्य विभागाच्या या चुकी मुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य देखील धोक्यात आलं आहे.  The young man discharged from the Covid Center was positive next day

हे देखील पहा - 

दरम्यान धारूर घाटातील चोरीच्या प्रकरणातील तीन तरुण आरोपींना न्यायालयासमोर हजर करायचे होते. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. यात एक आरोपी पॉझिटिव आला आहे त्याला उपचारासाठी धारूर येथील कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.अशी माहिती धारूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गोंविद बास्टे यांनी सांगितलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com