तो होणार होता 'जिल्हाधिकारी' मात्र कोरोनाने डाव साधला....!

जयेश गावंडे
रविवार, 16 मे 2021

भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण करून जिल्हाधिकारी होणाचे स्वप्न पाहणाऱ्या, पातूर तालुक्यातील तांदळी येथील प्रांजल प्रभाकर नाकट या तरुणाचा कोरोनाने उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू झाला.

अकोला: भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण करून जिल्हाधिकारी Collector होणाचे स्वप्न पाहणाऱ्या, पातूर तालुक्यातील तांदळी येथील प्रांजल प्रभाकर नाकट या तरुणाचा कोरोनाने उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. A young man Pranjal who dreamed of becoming a Collector died due to covid 

कोरोनामुळे प्रांजलचे फुफ्फुस बाधित झाले होते. विशेष म्हणजे प्रांजलला वाचवण्यासाठी मित्रपरिवारासह नातवाईकांनी 55 लाख रुपये उभे केले होते.  मात्र त्याचा अखेर काहीही उपयोग झाला नाही. अकोला येथे काही दिवस उपचार केल्यानंतर प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याला 10 मे रोजी एअर अॅम्बुलंसने हैद्राबादला तातडीने हलवले.

यासाठी समाजसेवक कृष्णा अंधारे यांनी अकोल्याचे डॉ. सतीश गुप्ता यांच्या माध्यमातून हैद्राबाद येथील रुग्णालयाशी संपर्क साधला होता. तलाठी प्रभाकर नाकट, अनुराधा नाकट यांचा कुशाग्र बुद्धिमत्तेचा प्रांजल आयएएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने कुटुंबीयात आनंद होता. परंतु नियतीला ते मंजूर नव्हते. A young man Pranjal who dreamed of becoming a Collector died due to covid 

हैद्राबादला Hydrabad डॉ. जिंदाल यांच्या मार्गदर्शनात प्रांजलवर Pranjal उपचार सुरू होते. प्रांजलच्या प्रकृतीत सुधारणा होत होती परंतु शुक्रवारी रात्री त्याची प्रकृती खालावली . आणि त्यातच त्याचा मृत्यू Death झाला. अतिशय खडतर परिस्थितीत प्रांजलने यावर्षीच आयएएसची IAS परिक्षा उत्तीर्ण केली होती. केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी प्रांजलच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून श्रद्धांजली वाहिली आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live