दाढीमुळे तुम्हाला आहे 'कोरोना' व्हायरसचा धोका ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

 

 

मुंबई - तुम्ही दाढी ठेवताय.. तर ही बातमी नक्की वाचा... दाढीमुळे कोरोना व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो अशा आशयाचे मेसेज, वेगानं व्हायरल होतायत. या दाव्यातलं नेमकं तथ्य शोधून काढण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. 

  • दाढीमुळे तुम्हाला कोरोना व्हायरसचा धोका ?
  • दाढीमुळे चेहऱ्यावरील मास्कचा प्रभाव घटतो
  • काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य ?

 

हल्ली अनेक पुरुष दाढी ठेवतात. अगदी किशोरवयीन मुलं असोत नाही तर कार्यालयीन कर्मचारी... दाढी ठेवणं फॅशन झालीय. मात्र हीच दाढी कोरोनासारख्या भयानक व्हायरसला निमंत्रण देऊ शकते असा दावा केला जातोय. दाढीमुळे चेहऱ्यावरील मास्कचा प्रभाव कमी होतो आणि विषाणू तोंडावाटे शरीरात जाऊ शकतात असा एक मेसेज सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. या मेसेजसोबत सीडीसी अर्थात अमेरिकेतील नॅशनल पब्लिक हेल्थ इस्टिट्यूट सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशनचा एक चार्टही व्हायरल होतोय.

 

त्यात म्हंटलंय की या चार्टनुसारच तुमची दाढी असायला हवी. यात जवळपास 13 प्रकारची दाढीच सुरक्षित असल्याचं म्हंटलंय. तर 18 प्रकारची दाढी असुरक्षित असल्याचं सांगण्यात आलंय. अशा प्रकारे दाढी ठेवली तर तोंडावर मास्क व्यवस्थितपणे बसत नाही. त्यामुळे विषाणुंना शिरकाव करण्यास संधी मिळते. दरम्यान आपली दाढी मोठी असेल तर व्हायरस पासून बचाव करणारे मास्क आपल्याला नीट फिट होत नाहीत आणि त्याचे आपल्या आरोग्यावरील गंभीर परिणाम परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. 

त्यामुळे संसर्गजन्य आजारापासून बचाव करता यावा यासाठी मास्क वापरले जातात खरे, मात्र त्यामुळे मास्क चेकऱ्यावर व्यवस्थितपणे बसायला हवा. दाढीमुळे मास्क नीट न बसल्यास संसर्गजन्य आजराचा धोका संभवतो. 

 

Web Title: is your beard responsible for putting you at risk of coronavirus ?


संबंधित बातम्या

Saam TV Live