100 रूपयांची नोट नव्या रूपात

100 रूपयांची नोट नव्या रूपात

नवी दिल्ली: १०० रुपयांची नोट आता आणखी लखलखणार आहे. चलनी नोटांमध्ये जांभळ्या रंगामुळे लक्ष वेधून घेणारीरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १०० रुपयांच्या नोटांना वार्निशचा कोट देण्याचं ठरवलं आहे.   नोटांचं आयुष्य वाढवण्यासाठी आरबीआय हा प्रयोग करत आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास १०० रुपयांच्या सर्व नोटांना वॉर्निश कोट लावला जाईल. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर काही नोटांना कोटिंग केलं जाईल.


वॉर्निश लावण्याचा हा प्रस्ताव आरबीआयच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आला आहे. हा अहवाल गुरुवारी जारी झाला. यासारख्या आणखी काही कल्पक योजना आरबीआय नोटांसाठी आणणार आहे. अंधांना हाताळता याव्यात यासाठी नोटा अधिक सोयीस्कर बनवण्याचाही आरबीआयचा प्रयत्न आहे. अहवालात असं म्हटलंय की इनटाग्लिओ प्रिंटींग, टॅक्टिकल मार्क, आकार, मोठे आकडे आदि विविध गोष्टींचा वापर करून अंध, अंशत: अंधांसाठी या नोटा हाताळणं अधिक सुकर करण्यात येणार आहे. 


Web Title : your rs 100 note to get a shine as rbi plans varnish coating for longer lifespan
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com