धावत्या लोकलमध्ये टिक टॉक करणाऱ्या तरुणाला अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

मुंबई : आपला व इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालून धावत्या लोकलमध्ये स्टंट करून त्याचा व्हिडियो व्हायरल करणारे स्टंटबाज आपण पाहिले असतील. अशाच एका स्टंटबाजाचा शोध घेऊन वडाळा लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली.

हार्बर मार्गावरील टिळक नगर रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमधून एका तरुणाने टिक टॉक व्हिडिओ काढला. या स्टंटबाज आवलियाचा व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारावर वडाळा लोहमार्ग पोलिसांनी त्याचा शोध घेऊन मंगळवार (ता.29) अटक केली.

फैजान इस्माईल शेख (वय - 20) असे त्याचे नाव असून, गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरात राहणारा आहे, अशी माहिती वडाळा लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिली.

Web Title: A Youth Arrested while making Tik Tok Video in Running Train

संबंधित बातम्या

Saam TV Live