जुन्या वैमनस्यातून युवकाची वाढदिवसाच्या दिवशीच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

अभिजित घोरमारे
बुधवार, 5 मे 2021

वाद उरकून काढत एका युवकाची जन्मदिवशीच निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रात्री १० वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील वरठी येथील मस्जिद जवळ घडली असून याप्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांसह तिघांना अटक केली आहे

भंडारा : वाद उरकून काढत एका युवकाची जन्मदिवशीच निर्घृण हत्या Murder करण्यात आल्याची धक्कादायक घटना रात्री १० वाजताच्या सुमारास भंडारा Bhandara जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील वरठी येथील मस्जिद जवळ घडली असून याप्रकरणी पोलिसांनी Police दोन सख्ख्या भावांसह तिघांना अटक केली आहे.Youth in Bhandara Murdered on Birthday

ममतांच्या शपथविधीच्या वेळी भाजपचे देशव्यापी धरणे

वैभव सुमेश नगराळे वय २४ वर्ष नेहरू वार्ड वरठी असे मृतकाचे नाव असून याच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी जोशेल शंकरनाथ शिंदे वय ३४ वर्ष, जयेश शंकरनाथ शिंदे वय ३० वर्ष, बब्बू गफ्फार शेख ३० वर्ष सर्व रा. हनुमान वार्ड वरठी अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. मयत वैभव याचा सुमारे तीन महिन्यापूर्वी जयेशसोबत वाद झाला होता. या वादातून वैभवने जयेशला मारहाण करून अपंग केले होते. याचाच राग मनात पकडून ही हत्या करण्यात आली.

मयत वैभवचा वाढदिवस होता, मित्रांसोबत वाढदिवस Birthday साजरा करून तो घराकडे परतत असताना वाटेत जयेशसोबत त्याचा वाद झाला. वाद विकोपाला गेला असताना तिथे जवळच असलेल्या जयेशचा भाऊ जोशेल याने धावत जाऊन घरातून चाकू आणला आणि त्याच्यावर वार करून जखमी केले.  यावेळी जखमी अवस्थेत वैभवने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असताना जोशेल, जयेश आणि बब्बु यांनी त्याचा पाठलाग करून पकडले आणि त्याच्यावर सपासप चाकूने वार करीत ठार केले.Youth in Bhandara Murdered on Birthday

मयत वैभव हा घरफोडीचा House Breaking गुन्हेगार असून एका टोळीचा तो सदस्य आहे. हत्येची माहिती मिळताच  तपासाची चक्रे फिरवली असता यानंतर तासभरातच तिघांनाही ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यांनी जुन्या वादातून वैभवचा खून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी वरठी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि वरठीच्या पथकाने महत्वाची कामगिरी निभावली आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live