शेतीच्या खरेदीसाठी आलेल्या तरुणाला पोलिस अधिकाऱ्याने मारले

Video of Police Officer Beating Youth gone viral in Parbhani
Video of Police Officer Beating Youth gone viral in Parbhani

परभणी : जिंतूर Jintur शहरातील आण्णाभाऊ साठे चौकात कर्तव्यावर असणारे जिंतूर पोलीस Police ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी ग्रामीण भागातून शहरात शेती Farming विषयक साहित्य खरेदीसाठी आलेल्या एका तरूणाला शिव्या देत, लाथा मारून कानशिलात मारलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर Social Media मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Youth Beaten by Police Officer in Jintur City of Parbhani

या व्हिडीओ बद्दल सोशल मीडियावर नागरिकांकडून अर्जुन पवार यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याभरापूर्वी राज्यातील Maharashtra पोलीस प्रशासनाला सामान्य माणसाच्या अडचणी लक्षात घेता काठी बळाचा वापर नं करण्याचे आदेश दिले असताना, एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने अशा पद्धतीची शिवीगाळ करून मारहाण करणे हे कितपत योग्य आहे.? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या व्हायरल व्हिडीओची परभणी जिल्ह्यात सध्या जोरदार चर्चा सुरू असून परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जयंत मीना याप्रकारा बद्दल काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखिल पहा

लॉकडाऊन काळात मुभा दिलेल्या व्यक्तीशिवाय ईतर कुणीही रस्त्यावर विनाकारण फिरु नये यासाठी काल प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली होती. मात्र परभणी जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी कृषी केंद्र उघडण्यास परवानगी दिली आहे.

मारहाण झालेला तरुण हा शेती विषयक सामान खरेदीसाठी शहरात आल्याची माहिती मिळत आहे. जिंतूर शहरात लॉकडाऊनच्या सुरुवातीलाच पोलीसांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून एका फिरत्या कापड व्यापाऱ्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली होती. काही दिवसांपुर्वी भरचौकात पोलीस उपनिरीक्षक आणि एका किराणा दुकान व्यापारी यांच्यात जोरदार वाद झाला होता. आता पुन्हा या व्हायरल व्हिडीओमुळे नागरिक संतप्त झाले असल्याचे जाणवत आहे. Youth Beaten by Police Officer in Jintur City of Parbhani

एपीआय पवार यांची पत्रकारांना उत्तर देण्यास एकेरी भाषेत टाळाटाळ
"घडल्या प्रकारा बाबत एपीआय अर्जुन पवार यांना प्रतिक्रियेसाठी फोनवर संपर्क साधला असता 'मी मारहाण करायला रस्त्यावरचा मोकार गुंड वाटलो का..? तुम्ही मला बोलू नका, मला कॉल का करता.? मला मनःस्ताप होत आहे, मी माझ काय करेन हे तुम्हाला कळून जाईल. तुम्ही कोण आहेत तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही कशाचे पत्रकार आहेत.? तुम्ही कोण मला विचारणारे..? तुम्ही पत्रकार असाल काय करायचे ते करा. मी पण कायद्याचा किडा आहे चल फोन ठेव" असे म्हणत एकेरी भाषा वापरुन पत्रकारांना मारहाणी बाबत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे. Youth Beaten by Police Officer in Jintur City of Parbhani

 रागाच्या भरात मारहाण करणे खेदजनकच..
"मारहाण झालेल्या तरुणाने API अर्जुन पवार यांना शिवीगाळ केली असल्याने रागाच्या भरात पवार यांनी त्या तरुणाला मारहाण केली आहे, मी आमच्या कर्मचाऱ्यांना सौम्य भूमिका घेण्यासाठी सुचविले आहे. परंतु अशा पध्दतीने मारहाण करणे हे खेदजनकच आहे, याबद्दल आम्ही चौकशी करून कायदेशीर कारवाई करीत आहोत.आम्ही आमच्या कौटुंबिक अडचणी बाजूला सारून अहोरात्र काम करीत आहोत, कुणाला जाणीवपूर्वक मारणे हा आमचा हेतू नाही. पोलिसांचे खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने व्हिडीओ व्हायरल केला असावा,'' असे पोलिस उपविभागीय अधिकारी
बापूराव दडस यांनी सागितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com