नोकरी गेली पण जिद्द नाही हरली! बिर्याणीच्या स्टॉलनं कसं बदललं त्याचं आयुष्य, वाचा...

साम टीव्ही
सोमवार, 21 डिसेंबर 2020
  • नोकरी गेली पण जिद्द नाही हरली
  • बिर्याणीच्या स्टॉलनं बदललं त्याचं आयुष्य
  • कष्टाच्या बळावर तरूणानं केली बेरोजगारीवर मात

लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. मुंबईतल्या अशाच एका तरूणानं नोकरी गेली म्हणून फुटपाथवर बिर्याणीचा स्टॉल टाकला. आणि या तरूणाचं नशिबच पालटलं.

ही रांग पाहिलीत. ही रांग कुठल्या रेशन दुकानासमोरची रांग नाहीये...तर ही रांग आहे बिर्याणी घेण्यासाठी. दादरमध्ये राहणाऱ्या अक्षय पारकरच्या अपार मेहनतीचं हे फळ आहे. त्याच्या हातची बिर्याणी मिळावी म्हणून स्टॉल सुरू होण्यापूर्वीच अशी तीन ते चार तास आधी रांग लागते. तस म्हंटलं तर लॉकडाऊनमुळे अक्षयचं नशीबच पालटून गेलंय. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शेफचं काम करणाऱ्या अक्षयची लॉकडाऊनमुळे नोकरी गेली. पुढे काय हा प्रश्न त्याच्यासमोर भेडसावत होता. मग पठ्ठ्यानं मनाशीच ठरवलं आतापर्यंत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरीखातर दुसऱ्यांना जेवू घालत आलो. आता स्व:ताच मालक होऊन काहीतरी करून दाखवायचं. आणि मग याच कल्पनेतून दादरमध्ये फूटपाथवर सुरू झाला पारकर बिर्याणी स्टॉल.

अक्षयच्या हातच्या बिर्याणीची चव चाखण्यासाठी खवय्ये आतूर झालेले असतात. त्यामुळे त्याच्या स्टॉलभोवती अशी गर्दी पाहायला मिळते. 

 चाळीत दहा बाय दहाच्या रूम मध्ये अक्षयचं कुटुंब राहतं आणि त्याच ठिकाणी तो ही बिर्याणी बनवतो. नोकरी गेली म्हणून खचून न जाता कष्टानं त्यानं पुन्हा डोलारा उभा केलाय. अक्षयच्या या मेहनतीला साम टीव्हीचा सलाम

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live