नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती, तब्बल २२ रुग्णांचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात  एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे.ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला.

एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असतानाच नाशिकच्या Nashik झाकीर हुसेन  रुग्णालयात zakir hussain hospital एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे.ऑक्सिजन टाकीतून Oxygen Cylinder गळती झाल्याने २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी प्रशासनाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. zakir hussain hospital Oxygen Cylinder leak

ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगवले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे रुग्णालयात Hospital ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. महापालिकेचे हे संपूर्ण कोविड रुग्णालय आहे. महापालिकेच्या या रुग्णालयात 171 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत तर 67 रुग्ण हे व्हेंटिलेटर आहेत.

या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात एकाच गर्दी झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस गर्दी कमी करत असून संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत.ऑक्सिजन गळतीमुळे रुग्णालयातील रुग्णांना आणि ऑटो रिक्षा इतर वाहनांना दुसरीकडे हलविण्यात आले. zakir hussain hospital Oxygen Cylinder leak

दरम्यान घटनेनंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मागच्या काही दिवसांंपूर्वीच रुग्णालयात ऑक्सिजन टाकी बसवण्यात आली होती. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live