पोलिसांच्या तात्काळ सेवेसाठी आता '100' ऐवजी '112' हेल्पलाईन नंबर

जयेश गावंडे
मंगळवार, 25 मे 2021

राज्यातील पोलिसांशी संकट काळात किंवा तक्रार निवारणासाठी नागरिक 100 नंबरचा वापर करतात. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून त्यांची मदत घेण्यासाठी हा क्रमांक वापरला जातो. मात्र हा नंबर आता बदलला जाणार असून, लवकरच 112 या एकाच हेल्पलाइनवरून सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. 

अकोला- राज्यातील पोलिसांशी Police संकट काळात किंवा तक्रार निवारणासाठी नागरिक 100 नंबरचा वापर करतात. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून त्यांची मदत घेण्यासाठी हा क्रमांक वापरला जातो. मात्र हा नंबर आता बदलला जाणार असून, लवकरच 112 या एकाच हेल्पलाइनवरून सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. 112 helpline number instead of 100 for emergency police service

लवकरच 112 या नंबरची सेवा सुरू होणार असल्याची माहिती अकोल्याचे Akola जिल्हा पोलीस अधीक्षक जि. श्रीधर यांनी दिली. केंद्र सरकारचा हा उपक्रम असून लवकरच राज्यभर याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 112 हा नंबर डायल केल्यानंतर अवघ्या पाचव्या मिनिटाला किंवा घटनास्थळाचे अंतर पाहून पोलीस घटनास्थळी लवकर हजर राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात पोलिसांना प्रशिक्षण देणे सुरू झाले आहे.

हे देखील पहा -

तर या उपक्रमासाठी अकोला जिल्ह्यातील पोलिसांसाठी 9 चारचाकी वाहने देण्यात आली आहेत. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ मदत हवी असल्यास त्यांना यापुढे  112 हा हेल्पलाईन क्रमांक डायल करावा लागणार आहे. विशिष्ट यंत्रणेच्या साहाय्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदांत हा फोन कोठून आला, हे संबंधितांना कळणार आहे. 

त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाइन, चाइल्ड हेल्पलाइन यांना एकाचवेळी सदर कॉलची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊ शकतील. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र पातळीवर एकच हेल्पलाइन असावी, असा सूर सर्व स्तरातून उमटला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली (ईआरएसएस ) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे. 112 helpline number instead of 100 for emergency police service

ज्यांना कोकणानं नाकारलं त्यांना आमच्या गुप्त बैठकीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही: उदय सामंत  (पहा व्हिडिओ)

112 साठी स्पेशल टीम तयार-

डायल 112 सुरू झाल्यानंतर कशाप्रकारे तात्काळ मदत केल्या जाईल यासाठी जिल्ह्यातील 55 पोलीस कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण Training देण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिली. संकट काळी नागरिकांनी 112 डायल केल्यानंतर लगेच त्या ठिकाणचे लोकेशन Location पोलिसांना प्राप्त होईल त्यानुसार घटनास्थळी अवघ्या पाच मिनिटात अथवा त्या घटनास्थळचे अंतर पाहून लवकरात लवकर किती वेळात पोलिसांची टीम पोहचेल हे ठरवलं जाईल. 

लगेच पोलीस घटनास्थळी दाखल होतील. एकाच नंबरची ही सेवा सुरू झाल्यानंतर पोलीस नागरिकांना सुरक्षा देण्याच्या दृष्टीने तात्काळ मदत पुरवली जाईल. आता याबाबत कुठले आदेश जरी नसले तरी हा उपक्रम लवकरच सुरू होणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी सांगितले. मात्र पोलीस प्रशिक्षण देण्यात येत आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live