गोंदिया मध्ये एकाच दिवशी एका महिलेला लशीचे दिले दोन डोस ( पहा व्हिडिओ )

अभिजीत घोरमारे
शुक्रवार, 21 मे 2021

कोरोना रोखण्यात रामबाण समजले जाणारे कोविशिल्डचा तुटवडा असताना, एका 62 वर्षीय महिलेला 10 मिनिटांच्या अंतराने दोन डोस देण्यात आल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील  गोरेगाव तालुक्यात  येत असलेल्या गिधाडी येथील लसीकरण केंद्रावर घडल्याने एकच खळबळ माजली आहे.

गोंदिया : एकाच दिवशी एका महिलेला कोरोनाचे Corona दोन डोस. एकीकडे कोरोना रोखण्यात रामबाण समजले जाणारे कोविशिल्डचा Covishield तुटवडा असताना, एका 62 वर्षीय महिलेला 10 मिनिटांच्या अंतराने दोन डोस देण्यात आल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील  गोरेगाव Goregaon तालुक्यात  येत असलेल्या गिधाडी Gidhadi येथील लसीकरण केंद्रावर घडल्याने एकच खळबळ माजली आहे. A 62 year old woman in Gondia received two doses of Covishield on the same day

महिलेल्या या आरोपाने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली असून आरोग्य विभाग महिलेच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे. नुसया केवलचंद पारधी (वय 62) असे त्या महिलेचे नाव असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

गिधाडी येथील अनुसयाबा केवलचंद पारधी या ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य आहेत. त्यांनी कोविशिल्ड इंजेक्शनचा पहिला डोस घेण्याकरिता गावातीलच शाळेत गेल्या. केंद्रावर उपस्थित आरोग्य सेविकेने त्यांना पहिला डोस दिला. त्यांना काही वेळ तिथेच थांबण्यास सांगण्यात आले. मात्र 10 मिनिटाने त्याच महिलेचे नाव घेऊन त्यांना पुन्हा बोलवण्यात आले. आणि दुसरा डोस देखील देण्यात आला. महिलेने घरी जाऊन हा सर्व प्रकार सांगितला. त्यांच्या मुलाने बघितले असता दोन इंजेक्शन दिल्याचे घाव दिसून आले. A 62 year old woman in Gondia received two doses of Covishield on the same day

पुण्याच्या प्रांजलचे कौतुकास्पद रेकॉर्ड

या प्रकारामुळे गिधाडी येथे तणावाची स्थिती आहे. सध्या त्या महिलेची स्थिती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीवर काही परिणाम होतो काय, याकडे लक्ष लागले आहे . 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live