१० वर्षाच्या मुलीवर ७ जणांनी केला अतिप्रसंग; सर्व आरोपी अल्पवयीन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जून 2021

हरियाणाच्या रेवाडीमध्ये काही मुलं मैदानात खेळता खेळता जवळच्या २४ मे रोजी एका शाळेच्या इमारतीत गेले. त्याठिकाणी ७ मुलांनी मिळून १० वर्षाच्या मुलीवर गँगरेप केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

रेवाडी -  हरियाणाच्या Hariyana रेवाडीमध्ये काही मुलं मैदानात खेळता खेळता जवळच्या २४ मे रोजी एका शाळेच्या इमारतीत गेले. त्याठिकाणी ७ मुलांनी मिळून १० वर्षाच्या मुलीवर गँगरेप Gangrape केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना एक आठवड्यानंतर सगळ्यांच्या समोर आली. पीडित मुलीच्या शेजारच्यांनी जेव्हा सोशल मीडियावर Social Media व्हिडीओ तिचा पाहिला तेव्हा  त्यांनी मुलीच्या घरच्यांना माहिती दिली त्यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. 7 people had rape on a 10 year old girl

त्या मुलीचे कुटुंब ९ जून रोजी पोलीस ठाण्यात पोहचले. तेव्हा त्याठिकाणी गुन्हा पोलिसात नोंदवण्यात आला आहे. रेवाडी Rewadi डीएसपी हंसराज म्हणाले की, या गुन्ह्यात ७ जणांविरोधात आयपीसी कलम ३७६, ३५४ सी, ५०६, पॉक्सो POSCO अंतर्गत गुन्हा Crime नोंदवण्यात आलेला आहे.

कोंबड्या घेऊन जाणाऱ्या वाहनाची पुलाला धडक !

या ७ आरोपींपैकी केवळ १ आरोपी वयस्क आहे. इतर आरोपींचे वय मात्र १०-१२ वयोगटातील आहे. मुलीच्या शेजाऱ्यांनी व्हिडीओच्या आधारे आरोपींची ओळख पटवली आहे. या प्रकरणाबाबत गुन्हा नोंद होताच पोलिसांनी सातही आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या शेजारी राहतात.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीची वैद्यकीय तपासणी Medical Test करण्यात आली आहे. त्यात मुलीवर गँगरेप झाल्याचं उघड झालं आहे. या ७ आरोपींपैकी ४ अल्पवयीन आरोपी हे मुलीचे नातेवाईक असल्याचे स्पष्ट झालं आहे. या आरोपींना सुधारगृहात पाठवलं गेले आहे. तर एक १८ वर्षाच्या आरोपीला कोर्टासमोर हजर करून त्याला जेलमध्ये पाठवलं आहे.  या प्रकरणात व्हिडीओ बनवणाऱ्याचा तपास पोलीस करत आहे. पोलीस ज्या लोकांनी हा व्हिडीओ बनवून व्हायरल केला यांचाही शोध घेत आहेत. 

हे देखील पहा -

पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांना चांगले ओळखत होते. ते एकाच गावात राहणारे देखील होते. जेव्हा मुलं खेळत होती, तिथे शेजारीच एक शाळेची इमारत होती. कोरोनामुळे Corona शाळा बंद आहेत. त्यामुळे या इमारतीत कोणीच नव्हतं. हा प्रकार घडल्यानंतर या मुलांनी गुन्ह्याबद्दल काहीच चर्चा केली नाही. पीडित मुलीनेही तिच्या कुटुंबाला याबद्दल काहीच सांगितले नव्हते.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला गेला. मुलीच्या शेजाऱ्यांनी जेव्हा ८ जून रोजी  व्हिडीओ पाहिला तेव्हा पीडितेच्या कुटुंबाला याबाबत माहिती दिली गेली.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live