जिद्दीच्या जोरावर 98 वर्षेच्या आजींने केली कोरोनावर मात

विजय पाटील 
मंगळवार, 4 मे 2021

सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथील 98 वर्षीय श्रीमती नकुसा दत्तु चव्हाण या कोरोणावर मात केली आहे. मात करून आपल्या घरी सुखरूप परतल्या आहेत.

सांगली :  सांगलीच्या Sangali कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथील 98 वर्षीय नकुसा दत्तु चव्हाण यांनी कोरोनावर Corona मात केली आहे. कोरोनावर मात करून आपल्या घरी सुखरूप परतल्या आहेत. एकीकडे कोरोनाच्या प्रकोपापुढे वैद्यकीय क्षेत्राबरोबर प्रशासनही हतबल झाले आहे, तर दुसरीकडे आजींनी आकरा दिवस उपचार घेऊन कोरोनावर सहजपणे मात करून इतरांना प्रोत्साहन दिले आहे. 98 year old grandmother overcame Corona in Sangali

यावरून आजीचा  पुनर्रजन्म झाला आहे असे  नातेवाईकांना वाटत आहे. आणि त्याबद्दल नातेवाईकांनी ढालेवाडी गावात पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा केला. आजीच्या पुर्वी काही शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यातच कोरोनाची लागण झाल्याचे समजले.

हे देखील पहा - 

मात्र यावर आजी आजीबात घाबरल्या नाहीत. कोरोना झाल्यानंतर त्यांना २३ एप्रिलला जिल्हा क्रिडा संकुलातील असलेल्या कोविड सेंटर Covid Center मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सलग आकरा दिवस वेंटिलेटरवर प्राणवायू घेत अंतरूणाशी खिळूनच होत्या. मात्र जिद्दीच्या जोरावर मृत्यूच्या दारातून यशस्वीपणे बाहेर पडल्या. 

वर्ध्यात नगरपालिका, पोलिस आणि  जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाहीत ४० दुकान सील 

सोमवारी कोविड सेंटरमधून आजींना सोडण्यात आले. आजीचा पुनर्रजन्म झाल्याबद्दल नातेवाईकांनी ढालेवाडी गावात पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा केला. अवघ्या आकरा दीवसात एक 98 वर्षीय आजी कोरोनावर मात करू शकते याचा आदर्श इतर कोरोना रुग्णांनीही घेण्यासारखा आहे. आजींना दवाखान्यातून सोडताना आजींचा जिल्हा क्रिडा संकुलातील कोविड सेंटरमधील  डॉक्टरांनी हार घालून सत्कार  केला.

Edited By- Sanika Gade

 

संबंधित बातम्या

Saam TV Live