Viral | कोरोना व्हायरसच्या धसक्याने लोक वाईन शॉपबाहेर
viral satya people maintain distance while standing wineshop

Viral | कोरोना व्हायरसच्या धसक्याने लोक वाईन शॉपबाहेर

कोरोना व्हायरसमुळे गर्दी टाळा असं सरकारकडून आवाहन करण्यात आलंय.त्यामुळं नियम पाळणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतायत.असेच काही लोक वाईन शॉपबाहेर अंतर ठेवून उभे असल्याचं पाहायला मिळतंय.गर्दी करू नका, 1 मीटर दूर राहा असं सरकारने आवाहन केलंय.यांनी मात्र, वाईन शॉपबाहेर पालन केलेलं दिसतंय.कसलीही गर्दी न करता शिस्तीत वाईन शॉपबाहेर हे सगळेजण उभे आहेत.आपली वस्तू घेतली की शिस्तीत गर्दी न करता निघूनही जात असल्याचं पाहायला मिळतंय.त्यामुळे वाईन शॉप बाहेर दिसत असलेल्या या शिस्तीचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओ केरळमधील असल्याचं बोललं जातंय.कोरोना व्हायरसमुळे सगळीकडेच जनजागृती केली जातेय.स्वच्छतेची काळजी घेतली जातेय.त्यामुळं वाईन शॉप मालकाने गर्दी नको म्हणून वाईन शॉपबाहेर काही अंतरावर पट्ट्या मारल्यायत.त्याचं पालनही हे मद्यपी करतायत.पण, काही ठिकाणी सुट्टी म्हणून वाईन शॉपबाहेर गर्दी पाहायला मिळतेय.

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी गर्दी टाळली पाहिजे.या ठिकाणी सरकारच्या आदेशाचं पालन या मद्यपींनी केल्यानं आता व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.तुम्हीही अशा सूचनांंचं पालन करा.आपल्याला कोरोनाला हरवायचंय, जर आपण खबरदारी घेतली तर हे जागतिक युद्ध नक्कीच जिंकू.

web title : viral satya people maintain distance while standing wineshop

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com