अभिनेता करण मेहराने अटक, पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 1 जून 2021

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेत नैतिकची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता करण मेहरा काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  मुंबई पोलिसांनी करण मेहरालासोमवारी रात्री अटक केली आहे.

मुंबई - ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेत नैतिकची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता करण मेहरा Karan Mehra काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मुंबई पोलिसांनी Mumbai Police करण मेहराला सोमवारी रात्री अटक केली आहे. Actor Karan Mehra arrested police action after wifes complaint

करणच्या पत्नीने करणसोबत झालेल्या वादानंतर गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून करण मेहरा आणि  निशा यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरी निर्माण झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र निशाने या चर्चा केवळ अफवा असल्याचे म्हंटले  होते.

भारतात सर्वप्रथम आढळलेल्या कोरोना व्हेरियंटचे WHO ने केले नामकरण

गेल्या ९ वर्षांपोसून  करण आणि निशा सोबत आहेत. २०१२ सालात त्यांनी लग्नगाठ बांधली होती. दोघांना ४ वर्षांचा एक मुलगा देखील आहे.  करण आणि निशा कामामध्ये व्यस्त असल्याने दोघांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्याचे  बोलले जात आहे. Actor Karan Mehra arrested police action after wifes complaint

करण 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आला. या मालिकेच्या माध्यमातून त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. या मालिकेत हिना खानने करणच्या पत्नीची भूमिका साकारली होती. मालिके शिवाय करण'नच बलिये 5' आणि 'बिग बॉस'मध्ये देखील दिसला होता. तर कारणची पत्नी निशा ही टीव्ही शो शादी मुबारक मध्ये दिसली होती. 

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live