Yellow fungus infection : काळ्या, पांढऱ्या बुरशीनंतर आता पिवळी बुरशी जास्त भयानक

yellow fungus india
yellow fungus india

मुंबई - कोरोना Corona विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे Second Wave देशातील आरोग्य यंत्रणेवर जागोजागी प्रचंड ताण पडलेला दिसत आहे. ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांना बेड्स मिळवण्यासाठी नातेवाईकांना करावी लागणारी धडपड, ही सर्व संकटं समोर असताना रोज नवे संकट उभे येऊन थांबत आहे. आता एक नवे संकट उभे राहिले आहे. काळ्या आणि पांढ्याऱ्या बुरशीच्या Fungus रोगाशी सामना करत असताना आता पिवळ्या बुरशीचा Yellow Fungus एक रुग्ण देशात सापडला आहे आणि तो अधिक धोकादायक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. After the black and white fungus now the yellow fungus is more dangerous says Doctors 

हे देखील पहा -

काळ्या बुरशीच्या रुग्णांची संख्या देशात आणि राज्यात वाढत असताना, रविवारी उत्तर प्रदेश Uttar Pradesh येथील गाझियाबाद Gaziabad येथे पिवळ्या बुरशीचा रुग्ण आढळला आहे आणि ही बुरशी अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या पिवळ्या बुरशीच्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

काय आहेत याची लक्षणं ? 

  • भूक कमी लागणे किंवा भूक लागतच नाही.
  • वजन कमी होणे. 
  • सुस्तपणा
  • पस ची गळती आणि जखमेवर हळूहळू उपचार होणे
  • कुपोषण
  • अवयव निकामी होणे
  • डोळे येणे

अशी लक्षणं दिसल्यास तुम्ही तातडीनं उपचार घेणे गरजेचे आहे.

पिवळी बुरशी होण्यामागचे कारण

  • तुमची अस्वच्छता हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे स्वतःची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच शिळं अन्न खाऊ नये.
  • घरातील दमटपणाही महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे अधिक दमट वातावणामुळे बुरशी होण्याचे संकटही असते.

उपचार
Amphotericin B injection अ‍ॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शन हे यावरील औषध आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com