Nashik Krushi Utpanna Bazar Samiti News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदी देविदास पिंगळे, उत्तम खांडबहाले उपसभापती

या निवडीनंतर नूतन पदाधिका-यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
nashik, nashik apmc
nashik, nashik apmcsaam tv

Nashik Bajar Samiti News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी देविदास पिंगळे (devidas pingle elected as chariman of nashik krushi utpanna bazar samiti) तर उपसभापतिपदी उत्तम खांडबहाले यांची बिनविराेध निवड झाली आहे. या निवडीनंतर दाेन्ही पदाधिका-यांच्या समर्थकांनी जल्लाेष करीत फुलांची उधळण केली. (Maharashtra News)

nashik, nashik apmc
Pune Bangalore National Highway Accident News : राेड राेलरला कारची धडक; पुणे-बंगळुर महामार्गावर दाेन ठार, चाैघे जखमी

नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीत देवीदास पिंगळे (devidas pingle) गटाला बारा तर शिवाजी चुंभळे (shivaji chumbhale) गटाला सहा जागा मिळाल्या. कोरोना काळात बाजार समितीने अन्नधान्य वाटपात गैरव्यवहार करून आर्थिक नुकसान केल्याच्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीपदाची निवड प्रक्रिया स्थगित करावी असा आदेश सहकार व पणन सह सचिवांनी नुकताच दिला हाेता. त्यास पिंगळे गटाने उच्च न्यायालयात दाद मागितीली हाेती.

nashik, nashik apmc
Rs 2000 च्या तब्बल 13 बनावट नाेटा बॅंकेत भरल्या, महिलेस अटक

उच्च न्यायालयाच पिंगळे गटास दिलासा मिळाला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली 'आपलं पॅनल' ने बाजार समितीत सिद्ध केलेले वर्चस्व आज पदाधिकारी निवडीत देखील दिसून आले.

आजच्या निवडीत देविदास पिंगळे यांची सभापतिपदी तसेच उत्तम खांडबहाले यांची उपसभापतिपदी बिनविराेध निवड झाली आहे. या निवडीनंतर नूतन पदाधिका-यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com