राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका रद्द...
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका रद्द...Saam Tv

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका रद्द...

सहकारी सोसायट्यांच्य निवडणुका झाल्यानंतरच राज्यातील कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होणार

खेड - राज्यातील सहकारी सोसायट्यांच्य निवडणुका झाल्यानंतरच राज्यातील कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होणार आहे. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत निकाल देत उच्च न्यायालयाने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूकीनंतर कृषी उत्त्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु करावी असे मत उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

हे देखील पहा -

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी या संदर्भात आदेश आज जिल्हा उपनिबंधकांना आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सचिवांना दिले आहेत. राज्यातील 23 ऑक्टोंबर 2021 पर्यत ज्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक मुदती संपलेल्या आहेत. त्या कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्यात आले आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका रद्द...
आत्महत्या करणाऱ्या 'त्या' शेतकऱ्याच्या घरी पोहचले आमदार मिटकरी

मात्र कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका होण्यापुर्वी गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका होण्याची आवश्यकता आहे. कारण आता कृसी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका आता झाल्यास सोसायट्यांना यामध्ये भाग घेता येणार नाही त्यामुळे राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाने नव्याने आदेश दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com