
Raju Shetti Pandharpur News : एकरकमी एफआरपीची लढाई जिंकल्यानंतर आता काटामारीच्या विरोधात लढाई सुरू केल्याचं सांगत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) नेते राजू शेट्टी यांनी राज्यातील साखर कारखानदार दरवर्षी शेतक-यांच्या घरावर साडेचार कोटींचा दरोडा टाकत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. शेट्टी यांनी आज पंढरपूरात (Pandharpur) पत्रकारांशी संवाद साधला. साखर कारखानदार मापात पाप करून शेतक-यांना लुटताहेत अशी टिप्पणी राजू शेट्टी (raju shetti) यांनी केली.
पंढरपूर (Pandharpur) तालुक्यात रोपळे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस वजन काटा उभारण्यात आला आहे. राजू शेट्टी यांच्या हस्ते आज वजन काट्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना साखर कारखानदार मापात पाप करून शेतक-यांना लुटतात असा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला आहे. (Tajya Batmya)
शेट्टी म्हणाले राज्यात दरवर्षी 13 कोटी 32 लाख टन उसाचे गाळप होते. यामध्ये सहकारी व खासगी साखर कारखानदार मिळून दरवर्षी एक कोटी तीन 32 हजार टन उसाची चोरी करतात. त्यातून सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांची साखर चोरी करून ऊस उत्पादक शेतक-यांवर दरोडा टाकतात.
राज्यात यावर्षी सुमारे 196 कारखाने सुरू आहेत. दरवर्षाला सुमारे एक कोटी टन उसाची चोरी होते. त्यातून सुमारे साडेचार हजार कोटीच्या साखरेवर डल्ला साखर कारखाने मारतात. त्याला चाप लावण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात वजन काटे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात पंढरपुरातून झाली आहे.
नाम मात्र किमतीमध्ये शेतकऱ्यांना वजन काटे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पुढील वर्षापासून प्रत्येक कारखान्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे बसवावेत असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra News)
एकरकमी एफआरपी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत (eknath shinde) बैठक झाली होती. मात्र त्याचे आदेश न निघाल्याने कारखाने एकरकमी एफआरपी देत नाहीत. त्यासाठी आता नवीन धोरण तयार करावे अशी मागणी शेट्टी यांनी केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही पक्षासोबत युती न करता स्वबळावर किंवा स्थानिक आघाड्यांंबरोबर लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.