Air Conditioner: एसीचा अतिवापर केला तर होऊ शकतो स्फोट, अशी घ्या काळजी

Priya More

एसी करते महत्वाचे काम

उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या गरमीपासून सुटका होण्यासाठी एअर कंडिशनर महत्वाचे काम करते. पण याच एसीचा स्फोट देखील होऊ शकतो.

Air Conditioner | Social Media

अमेरिकेत एसीचा स्फोट

अमेरिकामध्ये एसीच्या स्फोटामध्ये 20 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली त्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला.

Air Conditioner | Social Media

नियमित सर्व्हिसिंग

एअर कंडिशनरला आग लागण्याचे मुख्य कारण नियमित सर्व्हिसिंग न करणे हे आहे.

Air Conditioner | Social Media

धूळ साचते

एअर कंडिशनरच्या भागांमध्ये धूळ साचते आणि त्यामुळे ती जास्त गरम होते. त्यामुळे आग लागण्याचा धोका वाढू शकतो.

Air Conditioner | Social Media

ज्वलनशील पदार्थ

एसीजवळ ज्वलनशील पदार्थ ठेवू नका. त्यामुळे आग लागण्याची शक्यता आहे.

Air Conditioner | Social Media

पेट घेऊ शकतो

एसीजवळ कागद, पाने आणि कचऱ्याचे ढीग असल्याने आग लागण्याची शक्यता असते. कारण एसीच्या कॉम्परेसरमधून निघालेल्या गरम हवेमुळे कागद, कचरा पेटू शकतो.

Air Conditioner | Social Media

बनावट पार्ट

एअर कंडिशनरमध्ये कोणताही बनावट पार्ट बसवू नका. त्यामुळे देखील आग लागण्याची शक्यता आहे.

Air Conditioner | Social Media

स्वच्छता करा

एसीची योग्यरित्या स्वच्छता करत जा. वेळेवर सर्व्हिसिंग दिली नाही तर एसीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन आग लागण्याचा धोका वाढतो.

Air Conditioner | Social Media

NEXT: Skin Care Tips: सुंदर दिसण्यासाठी झोपण्यापूर्वी करा 'हे' उपाय

skin care tips | Social Media