Satish Daud Patil
प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील सोशल मीडियावर खूपच चर्चेत असते.
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवणाऱ्या गौतमीची क्रेझ दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
गौतमी पाटीलच्या डान्सने महाराष्ट्रातील तरुणांना अक्षरश: वेड लावलं आहे.
गौतमीला पाहण्यासाठी पुरूषांप्रमाणेच आता स्त्रीया देखील गर्दी करू लागल्या आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात गौतमीचे कार्यक्रम पाहायला मिळत आहेत.
नुकतेच गौतमी पाटीलने सोशल मीडियावर आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये गौतमी पाटील खूपच सुंदर दिसत आहे. गौतमीच्या फोटोंवर तरुणांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका चाहत्याने गौतमीला 'काळजी घे..., कडक उन्हात फिरू नकोस' असा सल्ला दिला आहे.