Baby Care Tips: लहान मुलांनी झोपताना उशी का घेऊ नये, काय आहे कारण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सवय

आपल्यापैकी बऱ्याचजणांना उशीशिवाय झोप लागत नाही. म्हणजे उशी वापरणे ही एक सवय झाली आहे.

habbit | Saam TV

झोप

उशीमुळे आरामदायक वाटते, झोपेची स्थिती सुधारण्यास मदत होते आणि झोप सुद्धा छान लागते.

Sleeping Habits | Saam Tv

लहान बालके

हे योग्य असले तरी लहान बाळासाठी उशी वापरणे चूकीचे ठरू शकते. कारण उशी वापरणे लहान बाळासाठी हानीकारक ठरु शकते.

Baby Care Tips | Saam Tv

उशी का घेऊ नये

पण लहान मुलांना उशी का घेऊ नये यामागचे कारण जाणून घ्या

Baby Care Tips | Saam Tv

बाळ

बाळाच्या जन्मानंतरच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये बाळाची मान आणि डोके नियंत्रित नसते.

Baby Care Tips | Saam Tv

लहान मुले

अशावेळी, बाळाचे नाक किंवा तोंड उशीने किंवा इतर मऊ पांघरुणाने झाकले गेले तर बाळ आपले डोके हलवू शकणार नाही. यामुळे लहान मुलांना गुदमरण्याचा धोका असतो.

Baby Care Tips | Saam Tv

ऍलर्जी

लहान मुलांना वेगवेगळ्या घटकांची ऍलर्जी असते. जसे की पक्षांची पिसे, धूळ इत्यादींविषयी मूलं खूप संवेदनशील असतात.

Baby Care Tips | Saam Tv

सपाट आणि टणक पृष्ठभाग

उशीवर झोपल्यामुळे तुमच्या बाळाला विविध प्रकारची ऍलर्जी होऊ शकते. म्हणूनच, बहुतेक बालरोगतज्ज्ञ बाळास सपाट आणि टणक पृष्ठभागावर झोपवण्यास सांगतात.

Baby Care Tips | Saam Tv

NEXT: Strong Woman Attraction| सशक्त महिला त्यांच्या जोडीदारामध्ये 'या' ५ गोष्टी शोधतात