Ek Phool Song: एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे; 'टीडीएम' मधील रोमँटिक गाणं

साम टिव्ही ब्युरो

आजवर असे अनेक चित्रपट आहेत जे चित्रपटाच्या कथेसह चित्रपटातील गाण्यामुळे चर्चेत राहिलेत. 

अशातच एक आगळावेगळा विषय घेऊन 'टीडीएम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटातील गाण्यांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे.

नुकतंच चित्रपटातील 'एक फुल' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून जे प्रेमीयुगुलांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.

'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने 'टीडीएम' चित्रपटातील 'एक फुल' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

या रोमँटिक गाण्याच्या संगीत रोहित नागभिडे यांनी केले असून, गाण्याच्या ओळी डॉ. विनायक पवार यांनी शब्दबद्ध केल्या आहेत.

प्रसिद्ध पार्श्वगायिका प्रियंका बर्वे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने गाण्याला चारचाँद लावले आहेत.

'टीडीएम' चित्रपटातील नवोदित जोडगोळी अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी हे या गाण्यावर थिरकले आहेत.

NEXT: Vidula Chougule: |हिच्या केसामधी गजरा, पाहा हिचा नवा नवा नखरा... विदुलाचा मराठमोळा थाट