जेवणानंतर ''ही'' कामं करु नका...

Avoid doing these things after meals
Avoid doing these things after meals

निरोगी आरोग्यासाठी रोज व्यायाम Exercise आणि सकस आहार Diet याची गरज असते, पण त्या सोबतच या दोहोंशी संबंधित काही नियमांचे पालन करणे ही महत्वाचे असते. हे नियम फार पूर्वीपासून आपल्याकडे चालत आले आहेत. उदाहरणार्थ भोजनानंतर शतपावली घातल्याने अन्न व्यवस्थित पचण्यास मदत तर होते, त्याशिवाय जेवण झाल्यानंतर शरीरामध्ये जी सुस्ती येते, ती न येता, शरीरामध्ये उत्साह Enthusiasm टिकून राहतो. अशाच अनेक पद्धती आपल्याकडे मानल्या जात असतात. Avoid doing these things after meals 

याप्रमाणे, जेवणानंतर काय करावे याबद्दल काही नियम Rules आपल्याकडे आहेत, त्याचप्रमाणे काय करू नये या बद्दलही विचार करणे महत्वाचे आहे. काही व्यक्तींना जेवणानंतर गोड काहीतरी खाण्याची सवय असते. पण वजन Weight वाढेल या भीतीपोटी गोड पदार्थ खाण्याऐवजी ते व्यक्ती भोजनानंतर फळे Fruits खाऊन आपली गोड खाण्याची इच्छा पूर्ण करत असतात. पण भोजनानंतर फळांचे सेवन शक्यतो करायचे नसते. कारण असे की, फळांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. हे फायबर पोटातील अन्नामध्ये मिसळल्याने अन्नाचे पचन लवकर होत नाही. 

यामुळे नंतर पोटात दुखणे, गॅस Gas होणे अशा तक्रारी उद्भवू शकतात. जर फळे खायची असतील तर ती जेवण्याचा अगोदर काही काळ खावीत किंवा जेवणानंतर तासाभराने खावीत. जेवणानंतर त्वरित धूम्रपान करण्याची सवय ही अपायकारक आहे, असे वैज्ञानिकांचे scientists सांगणे आहे. काही व्यक्तींना जेवल्यानंतर लगेचच दात घासण्याची सुद्धा सवय असते. असे केल्याने दातावरील इनॅमल खराब होऊन दातांना अपाय होण्याची सुद्धा शक्यता असते. जेवल्यानंतर अन्नाचे अंश तोंडातून काढून टाकण्यासाठी स्वच्छ चुळा भरने आणि अर्ध्या तासाने दात घासावेत. Avoid doing these things after meals

पुष्कळ लोकांना जेवणानंतर लगेचच चहा Tea घेण्याची सवय असते. पण चहामधील टॅनिनमुळे आपण खालेल्या अन्नामधील प्रथिने Protein आणि लोह ही तत्वे शरीरामध्ये व्यवस्थित शोषली जाऊ शकत नाही. त्यामुळे जेवल्यानंतर लगेचच चहा घेणे शक्यतो टाळावे. दुपारचे किंवा रात्रीचे जेवण झाले की सुस्ती येते, काही व्यक्ती लगेच आडवे होतात. पण हे करणे प्रयत्नपूर्वक टाळायल पाहिजे. भोजनानंतर आपण जितके अधिक क्रियाशील राहू, तितकेच आपल्या पोटातील अन्नाचे पचन व्यवस्थितपणे होते. पण जेवल्यानंतर लगेचच झोपल्याने पचनक्रिया शिथिल होते, आणि मग पचनाशी संबंधित तक्रारी सुरु होतात.

हे देखील पहा 

भोजनानंतर त्वरित अंघोळ करण्याचे ही टाळावे. जेवण झाल्यानंतर आपल्या शरीरातील रक्तप्रवाह अन्नाच्या पचनासाठी पोटातील अवयवांकडे वळविला जातो. मात्र, अंघोळ केल्याने हा रक्तप्रवाह हातापायांच्या दिशेने वळविला जाऊन, शरीराचे तापमान ही काही वेळाकरिता कमी होऊन जात असते. त्यामुळे पोटातील अन्नाचे व्यवस्थित पचन होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जेवण झाल्यानंतर त्वरित गाडी चालविण्याचेही शक्यतो टाळावे. जेवण झाल्यानंतर शरीरातील रक्तप्रवाह पोटाकडे वळविला जात असल्याने, मेंदूला काही कमी प्रमाणात रक्त पुरवठा होत असतो. यामुळे जेवण झाल्यानंतर त्वरित शरीरामध्ये शैथिल्य जाणवून झोप येत असल्याची भावना होते. म्हणून जेवणानंतर त्वरित गाडी चालविणे टाळावे. Avoid doing these things after meals

Edited By- Digambar Jadhav
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com