Breaking: पुणे आणि रायगडला लाॅकडाऊनमधून तुर्तास मुक्ती नाहीच!

Breaking:  पुणे आणि रायगडला लाॅकडाऊनमधून तुर्तास मुक्ती नाहीच!
MAHARASHTRA UNLOCK 1.jpg

मुंबई : राज्यसरकारने 10 वी 12 वीची बोर्ड परीक्षा रद्द संबंधी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. यानुसार, राज्यात पाच विविध  स्तरावर लॉकडाउन आणि अनलॉक करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. (Pune and Raigad are not free from lockdown immediately!) 

या पाच स्तरावर पहिल्या स्तरवर 18 जिल्हे, दुसऱ्या स्तरावर 5 जिल्हे, तिसऱ्या स्तरावर 10 जिल्हे,चौथ्या स्तरावर 4 जिल्हे तर  पाचव्या स्तरावर 10 जिल्हे असणार आहेत.  तर ज्या ठिकाणी पॉझिटिव्ही रेट 5 आणि 25 टक्के आत ऑक्सिजन बेड ओक्युपेन्सी आहे,  अश्या ठिकाणी लॉकडाऊन राहणार नाही, असा निर्णय राज्यसरकारने मंत्रिमंडळाच्या बाठकीत घेण्यात  आला आहे. 

- हे आहेत पाच झोन  
झोन 1 : औरंगाबाद, भंडारा,  बुलढाणा,  चंद्रपूर,  धुळे,  गोंदिया,  जळगाव,  लातूर,  नागपूर, नांदेड,  नाशिक,  परभणी,   ठाणे,  वर्धा,  वाशीम
झोन 2 : अहमदनगर, अमरावती, हींगोली, मुंबई ,नंदुरबार, मुंबई उपनगर 
झोन 3 : बिड, अकोला, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सांगली,  सिंधुदुर्ग
झोन 4 : पुणे, रायगड,
झोन 5 :  उर्वरित जिल्हे 

- कोणत्या झोन मध्ये निर्बंध शिथिल होणार; 

-  पाच टप्प्यांमध्ये ज्या जिल्ह्यात 5  टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड 25  टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाइड आहेत, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल. यामध्ये रेस्टॉरंट, मॉल, नियमित दुकानं किंवा ट्रेन देखील सुरू होतील. 

 जिल्हे आणि महानगर पालिकांचे धरून एकूण ४३ भाग पाडले आहेत. या सर्व नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे 

- झोन 1: मधील सर्व निर्बंध उठविण्यात येणार 

- झोन 1 मध्ये  चित्रपटगृहे,  शूटिंग, लग्न समारंभ,  आर्थिक व्यवहार, सार्वजनिक वाहतूक सेवा, आंतरजिल्हा प्रवास,  100 टक्के सुरू. 

-झोन 1 आणि 2 मध्ये,  सायकलिंग, walking ट्रॅक, कार्यालये, क्रीडा स्पर्धा,   थिएटर्स , शूटिंग, सांस्कृतिक कार्यक्रम,  लग्नसामारंभ,  सामाजिक कार्यक्रम, अंत्यविधीला परवानगी 

- झोन 3 मध्ये : सरकारी कार्यालये, शूटिंग, जिम,सळून, पार्लर, सार्वजनिक वाहतूक सेवा 

- मुंबई लोकल सेवा सर्वसमन्यांसाठी तूर्तास तरी बंद, मुंबई दुसऱ्या टप्प्यात अनलॉक होणार 

- पुणे आणि रायगडला लाॅकडाऊनमधून तुर्तास मुक्ती नाहीच! 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com