एमबीबीएस परीक्षेसाठी पॉझिटिव्ह येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी द्या- नाना पटोले 

एमबीबीएस परीक्षेसाठी पॉझिटिव्ह येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी द्या- नाना पटोले 
nana patole

कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पासून आपल्या विदर्भ दौऱ्याला सुरवात केली असून पटोले हे विदर्भातील प्रत्येक जिल्हात जाऊन तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहे. पटोले यांनी याची सुरवात आपल्या जन्मभूमी गोंदियातून केली आहे. पटोले हे आज कांग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यावर प्रथमच गोंदियाला आल्यावर पत्रकारांशी बोलत होते. (Give another chance to the students who come positive for MBBS exam- Nana Patole)

या वेळी पटोले यांनी बोलताना सांगितले की महाराष्ट्रामध्ये येत्या 10 जूनपासून एमबीबीएस मेडिकलच्या ऑफलाईन परीक्षा सुरू होणार असून परीक्षेत समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांना कोविड ची RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.  परंतु, ज्या विद्यार्ध्यांची RTPCR चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्या विद्यार्ध्यांचे वर्ष वाया जाऊ शकते म्हणून महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकड़े ज्या विद्यार्ध्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असेल त्या विद्यार्थ्यांना याचं वर्षी परीक्षेची संधी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

हे देखील पाहा

तर दुसरीकडे भाजप हे नाना पाटोले यांची पात्रता काढत असून दिल्लीस सुरु असलेले शेतकऱ्याचे आंदोलन ही भाजपाची पात्रता दाखवत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. लवकरच भाजपला कांग्रेस त्यांची पात्रता दाखवेल असे नाना पाटोले म्हणाले. तर मराठा आरक्षणाला घेऊन संभाजी राजे हे १६ जूनला आंदोलन करणार असून या संदर्भात नाना पाटोले याना विचारणा केली असता  मला त्यांच्या आंदोलनाबद्दल माहिती नसल्याचे बोलत त्यांनी यावर भाष्य करायचे टाळले.  

तर दुसरीकडे पेट्रोलच्या वाढीव किंमती पाहता कांग्रेसच्या वतीने उद्या राज्यातील 288 विधानसभा क्षेत्रातील 1 हजार पेट्रोल पंपा समोर कांग्रेस पक्ष मोदी सरकारच्या पेट्रोल १०० री पार संदर्भात सेल्फी काढत आंदोलन करण्याची माहिती नाना पाटोले यांनी दिली आहे. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

 


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com