भंडारा जिल्हाधिकाऱ्यांचा मास्टर प्लान, ४ सूत्री कार्यक्रमाने कोरोनावर नियंत्रण

Bhandara Collector Sandip Kadam
Bhandara Collector Sandip Kadam

भंडारा : भंडारा Bhandara जिल्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्राच्या टॉप १० Top Ten  कोरोना हॉटस्पॉट Corona Hotspot जिल्ह्यांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आल्यावर भंडारा जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले जिल्हाधिकारी संदीप कदम Sandip Kadam यांनी अॅक्शन मोडवर येत कोरोना रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला असून ४ सूत्री कार्यक्रमाच्या अवलंब करत भंडारा जिल्हाला कोरोना मुक्तीच्या वाटेवर आणून ठेवले आहे. Bhandara Collector Sandip Kadam Efforts to make Corona Free District

भंडारा जिल्ह्यात दुसऱ्या लाटेने Corona Second Wave अक्षरशः थैमान घातले असून पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोना ग्रस्थाची दुप्पट रुग्णसंख्या वाढत तब्बल ३८ हजार ३०९ लोक कोरोना बाधित नवीन रुग्ण आढळले असून दुसऱ्या लाटेत तब्बल ६५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी मास्टर प्लान तयार करत चार सूत्री कार्यक्रम आखुन त्याची कड़क अंमलबजावणी सुरु केली.

या चार सूत्री कार्यक्रमात जास्तीत जास्त कंटेनमेंट झोन Containment Zone तयार करणे कडक लॉकडाउन Lock Down लावणे, जिल्ह्यातील मेडीकलवेस्ट (वैद्यकीय कचरा) जिल्ह्या बाहेर पोहचवून निष्ट करणे व जास्तीत जास्त बाधित अतिगंभीर रुग्णाना ऑक्सीजन कॉन्सट्रेंटर पुरविणे, ह्या बाबी समाविष्ट केल्या.Bhandara Collector Sandip Kadam Efforts to make Corona Free District

संपूर्ण जिल्ह्यात जवळ जवळ ४०० च्या वर कंटेन्मेंट झोन तयार करून त्यात पोलिसांचा खडा पहारा उभा केला. शिवाय स्वतः कंटेन्मेंट झोनच्या भेटी वाढविल्या. जिल्ह्यात कडक लॉकडाउनही लागू करत त्याची आपल्या देखरेखी खाली कडक अंमलबजावणी करून घेतली.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात ऑक्सीजन पुरविणे कठिण जात असल्याने जास्तीत जास्त अती गंभीर रुग्णांना ऑक्सीजन कॉन्सट्रेंटर घरीच पुरविले. त्यामुळे मृत्युचे प्रमाणही रोखता आले आहे. या चार सूत्री कार्यक्रमामुळे कोरोना वर नियंत्रण मिळविले असून ११ दिवसात अकरा हजा च्या वर रुग्ण कोरोनामुक्त होत घरी पोहचले आहेत. Bhandara Collector Sandip Kadam Efforts to make Corona Free District

जिल्हाधिकाऱ्यांच्या चार सूत्री कार्यक्रमामुळे भंडारा जिल्ह्या आता कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असून जिल्ह्याच्या या कामाची प्रशंसा केंद्रीय आरोग्य सचिव व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही केली आहे.

Edited By - Amit Golwalkar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com