Gold Silver Price Today (4th October) : पितृपक्षात सोन्याच्या भावात घसरण, चांदीची चमकही उतरली; जाणून घ्या आजचे भाव

Today's 4th October Gold Silver Rate In Maharashtra : महाराष्ट्रात आज सोन्या-चांदीसाठी किती पैसे मोजावे लागतील यावर एक नजर टाकूया.
Gold Silver Price Today (4th October)
Gold Silver Price Today (4th October)Saam Tv

Gold Silver Rate In Maharashtra (4th October):

सोन्याच्या दरात सुरु असलेली घसरण आजही कायम आहे. मागील आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीचे भाव घसरल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदीची चांगली संधी मिळाली आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोमवारी सोन्याच्या दरात घट झाली. जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात यावर्षी १८३६ डॉलर प्रति तोळा घसरण झाली आहे. मागच्या आठवड्याची किंमतींवर नजर टाकली तर मुंबईत ३३० रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.

Gold Silver Price Today (4th October)
Gold Silver Price Today (3rd October) : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनं उच्चांकी पातळीच्या तुलनेत ४००० रुपयांनी स्वस्त

सोन्याच्या दरातील घसरणीचा आलेख आजही कायम आहे. महाराष्ट्रात आज सोन्या-चांदीसाठी किती पैसे मोजावे लागतील यावर एक नजर टाकूया.

1. Good Return नुसार आजचा सोन्याचा भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्नुसार, आज २२ कॅरेट सोन्यासाठी (Gold) ५२,५९० रुपये मोजावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटनुसार ५७,३७० रुपये मोजावे लागतील. मे महिन्यात सोन्याने आजवरची उच्चांक पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति तोळे ६१,८४५ रुपयांवर पोहोचलं होतं. सोन्याच्या उच्चांकी किंमतीशी तुलना केली तर आजचा भाव तब्बल ६००० रुपयांनी कमी आहे.

2. चांदीचा आजचा भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्नुसार, चांदीचा (Silver) आजचा प्रति किलो दर ७०,७०० रुपये आहे. आज चांदीच्या भावात २००० रुपयांनी घसरण झाली. चांदीच्या किमती घसरल्यामुळे खरेदीदारांचा कलही चांदी खरेदीकडे पाहायला मिळेल.

3. मुंबई-पुण्यात आज सोन्याचे दर किती?

आज गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेटसाठी ५७,३७० तर पुण्यात ही भाव सारखेच आहे. अशात नाशिकमध्ये सोन्याच्या भावात किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली. नाशिकमध्ये आज सोन्याचा भाव हा २४ कॅरेटसाठी ५७,४०० रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com