सेवानिवृत्त झालेल्या पालिका चालकास आपल्या गाडीत बसवून आयुक्तांनी सोडले घरी !

चेतन इंगळे
बुधवार, 2 जून 2021

मीरा भाईंदर महानगरपालिकेचे पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी आपल्या सेवानिवृत्त झालेल्या चालकास गाडीत बसवून त्यांना आपल्या घरी सोडले आहे. प्रकाश पांडुरंग पाटील (वय ६०) हे चालक काल वयोमर्यादेनुसार सेवानिवृत्त झाले झाले होते.

भाईंदर :- मीरा भाईंदर महानगरपालिकेचे Mira-Bhayandar Municipal Corporation पालिका आयुक्त दिलीप ढोले Dilip Dhole यांनी आपल्या सेवानिवृत्त झालेल्या चालकास गाडीत बसवून त्यांना आपल्या घरी सोडले आहे. प्रकाश पांडुरंग पाटील (वय ६०) हे चालक काल वयोमर्यादेनुसार सेवानिवृत्त झाले झाले होते. The commissioner put the retired municipal driver in his car and left him at home

निवृत्त झालेल्या चालकाने आपली सेवा ग्रामपंचायती पासून पालिकेला तब्बल ३४ वर्ष दिली होती. त्यानुसार ते सेवानिवृत्त झाल्याने पालिका आयुक्तांनी त्यांच्या सोडून समाजात एक वेगळा संदेश दिला आहे.

"माझ्यावर खोटे आरोप केले गेले : अभिनेता करण मेहरा यांचे जामिनानंतर स्पष्टीकरण

सेवानिवृत्तीच्या Retire निमित्ताने केवळ सत्कार करून निरोप न देता, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ऋण व्यक्त करण्याचा नवा पायंदा पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी हाती घेतलेला पाहायला मिळाला. The commissioner put the retired municipal driver in his car and left him at home

हे देखील पहा -

याचा प्रत्यय सोमवारी ३१ मे रोजी पालिकेच्या सेवेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ देऊन, गौरव करण्यासोबत त्यांच्या कुटुंबियांचाही सन्मान करण्यासाठी त्यांनी स्वतः आपल्या गाडीत बसवून पालिकेची सेवा केलेल्या चालकास त्यांच्या घरी सोडण्यासाठी या उपक्रम केला. तर या त्यांच्या कार्यामुळे मन हेलावून टाकणारा क्षण हा पालिकेत दिसून आला आहे.

Edited By - Shivani Tichkule 


संबंधित बातम्या

Saam TV Live