अकोलेकरांना दिलासा; कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

जयेश गावंडे
शुक्रवार, 28 मे 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अकोला जिल्ह्यात दररोज वाढत्या रुग्णांचा नवा विक्रम प्रस्थापित करणारा कोरोना संसर्ग आता कमी होताना दिसतोय. गेल्या तीन दिवसांपासून अकोल्यात नव्याने कोरोना बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा, कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.

अकोला : कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेत Wave जिल्ह्यात दररोज वाढत्या रुग्णांचा नवा विक्रम प्रस्थापित करणारा कोरोना संसर्ग आता कमी होताना दिसतोय. गेल्या तीन दिवसांपासून अकोल्यात Akola नव्याने कोरोना बाधित होणाऱ्या  रुग्णांपेक्षा, कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. Consolation To Akolekar Big Drop In Corona Outbreaks

मात्र मृत्युदर Death Ratio कमी Reduce करण्यासाठी प्रशासनासमोर आव्हान आहे. कोरोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना किंचित दिलासा देणारी हि बाब आशेचा किरण म्हणून समोर येत आहे.

हे देखील पहा -

नव्याने बाधित होणाऱ्यांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली असून, गत दिवसांत 2732  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1445 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच रुग्ण वाढीपेक्षा दुपटीने रुग्णांची संख्या कमी झाली आहे. Consolation To Akolekar Big Drop In Corona Outbreaks

गतवर्षी डिसेंबर अखेरीस घसरणीला लागलेला कोरोनाचा आलेख फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा उंचावला, ही लाट मे च्या मध्यापर्यंत उच्च पातळीवर पोहोचली आहे. दररोज शंभर ते दोनशेच्या घरात नोंदविली जाणारी दैनंदिन रुग्णसंख्या 500 ते 700 पर्यंत जाऊन ठेपली आहे. सोबतच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे.

गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या प्रशासनासह नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहे. अकोल्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. एप्रिल महिन्यात तर कोरोनाने कहरच केला रुग्णसंख्येबरोबर मृतकांचीही संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. Consolation To Akolekar Big Drop In Corona Outbreaks

दरम्यान मे महिन्याचा शेवटचा आठवडा अकोला जिल्ह्यासाठी थोडा का होईना दिलासादायकच म्हणावा लागेल. कारण या आठवड्यात गेल्या पाच दिवसांपासून रुग्णवाढीपेक्षा कोरोना वर मात करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

अंबरनाथचं जीआरपी धरण म्हणजे मद्यपींचा अड्डा

पाच दिवसांत अकोल्यात 2732 रुग्णांनी कोरोना वर मात केली तर 1445 नव्या रुग्णांची नोंद झालीय. लाट जरी ओसरत असली तरी अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी संपूर्ण कोरोना मुक्तीसाठी त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. Consolation To Akolekar Big Drop In Corona Outbreaks

कोरोना नियम पाळण्याचे आवाहन प्रशासन नियमित करत आहे. दरम्यान जून च्या पहिल्या आठवड्यात आणखी दिलासा देणारी बातमी येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. रुग्ण संख्या जरी कमी होत असली तरी होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. कारण अकोल्यात मृतांच्या आकड्याने हजारी गाठली आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live