कोरोना रुग्णाचा खाजगी दवाखान्यासमोर मृत्यू; मृत्यूनंतर ३ तासांनी घंटागाडीत मृतदेहाचा अंतिम प्रवास...  

विश्वभूषण लिमये
मंगळवार, 4 मे 2021

उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनामुळे क्लेषदायी चित्र समोर येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे एका कोरोना पॉसिटीव्ह रुग्णाचा उपचारा अभावी मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर सलग तीन तास उघड्यावर हा मृतदेह हॉस्पिटलच्या बाहेर ठेवण्यात आले होते.

उस्मानाबाद : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनामुळे Corona क्लेषदायी चित्र समोर येत आहे. उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यातील तेर येथे एका कोरोना पॉझिटिव्ह Positive रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू Dead झाला आहे. मृत्यूनंतर सलग तीन तास हा मृतदेह उघड्यावर हॉस्पिटलच्या बाहेर ठेवण्यात आला होता . Corona patient dies in front of private clinic 

या वयोवृद्ध रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी शववाहिका Ambulance नसल्याने शेवटी घंटागाडीतून मृतदेहाचा अंतिम प्रवास करावा लागला. तेर पासून जवळच असणाऱ्या किणी येथील छगन सोनटक्के हा रुग्ण अस्वस्थ वाटत असल्याने तेर मधील खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी तो रुग्णलयात दाखल झाला होता. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णाला डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. 

हे देखील पहा -

अचानक शासकीय रुग्णालय गाठायच्या अगोदरच रुग्ण खाजगी रुग्णालयासमोर चक्कर येऊन कोसळला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस Police पंचनाम्यानंतर रुग्णाची ग्रामीण Rural रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोविड Covid तपासणी केली आहे. त्यामध्ये त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला  आहे. Corona patient dies in front of private clinic

जाणून घ्या कुठल्या कुठल्या शहरात लॉकडाऊन

दरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांना मृतदेह किणी या गावी नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध होत नसल्याने शेवटी तेर ग्रामपंचायतीच्या घंटागाडीमध्ये मयताचा अखेरचा प्रवास झाला आहे. या संतापजनक प्रकारामुळे गावपातळीवरील आरोग्य प्रशासकीय यंत्रणा कुचकामी आणि हतबल ठरल्याचं समोर आलं आहे.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live