धक्कादायक - कोरोनाने अवघ्या १३ तासात कुटुंब उध्वस्त...

Three in a family died due to corona on single day
Three in a family died due to corona on single day

सांगली  : जिल्ह्यातील Sangli शिराळा तालुक्यातील शिरशी येथील झिमुर कुटुंबीयांवर Family कोरोनाने Coronaघाला घातला आहे. अवघ्या १३ तासात कुटुंब उध्वस्त झाले आहे. सकाळी ५ वाजता वडील, तर सायंकाळी पाच वाजता आई आणि त्यानंतर सहा वाजता मुलगा असे तेरा तासात कुटुंब उध्वस्त झाले आहे. Corona Took Away Three in a family in a Single Day at Sangli

आठ दिवसांपूर्वी या मुलाच्या चुलत भावाचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे आठ दिवसात झिमुर कुटुंबातील चार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आई, वडील आणि मुलगा व पुतण्या असा चौघांचा मृत्यू झाल्याने शिरशी गावात शोककळा पसरली आहे...

हे देखिल पहा

शिराळा हा डोंगरी व दुर्गम तालुका तसा अति पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील बहुतांशी लोक हे नोकरीनिमित्त मुंबईला असतात. तसेच शिराळा उत्तर भागातल्या शिरशी गावातील झिमुर कुटुंब हे उदरनिर्वाहासाठी मुंबईला होते. ज्यांचा मृत्यू झाला ते वडील मिल कामगार होते. सेवानिवृत्त झाल्याने आपल्या पत्नीसह १५ वर्षांपूर्वी ते गावी आले व शेती करू लागले. Corona Took Away Three in a family in a Single Day at Sangli

त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत मुली विवाहित आहेत. मुलगा मुंबईत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता .त्याचे एक वर्षा पूर्वी लग्न झाले. त्याची पत्नी ही पदवीधर आहे. तो इंजिनिअर असणारा मुलगा पंधरा दिवसांपूर्वी गावीआला. त्यावेळी आई आजारी असल्याने गावीच थांबला. तर आईला कोरोनाची लागण झाली... तिच्यावर उपचार सुरू होते.

दरम्यान त्याच्या वडिलांना कोरोणाची लागण झाली. त्या दोघांवर उपचार सुरू झाले. आई वाडिलांच्या तब्बेतीत सुधारणा झाली. मात्र पुनः वडिलांची तब्बेत बिघडली. दरम्यान मुलाला ही कोरोनची लागण झाली. त्याच्यानंतर वडिलांचे निधन झाले. त्यावेळी आई आणि मुलगा व्हेंटिलेटरवर होते.

सोमवारी सकाळी पाच वाजता पहाटे वडिलांचे निधन झाले. सकाळी झिमुर कुटुंबीयांनी त्यांचे अंत्यसंस्कार आटोपले. तो पर्यंत आई आणि मुलगा व्हेंटिलेटरवर होते. सायंकाळी पाच वाजता आईचे निधन झाले. हा झिमुर कुटुंबीयांवर १२ तासात दुसरा आघात होता. ते दुःख समोर उभे असतानाच आईच्या निधनानंतर अवघ्या एका तासात मुलाचा मृत्यू झाला. Corona Took Away Three in a family in a Single Day at Sangli

झिमुर कुटुंब दुःखात बुडाले एकाच दिवशी हा आघात झाल्याने शिरशी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. आठ दिवसांपूर्वी याच मुलाच्या चुलत भावाचे कोरोनामुळे निधन झाले त्यामुळे आठ दिवसात झिमुर कुटुंबातील चार जणांचा कोरोनाने बळी घेतल्याचे पाहण्याची दुर्दैवी वेळ गावावर आली.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com