CORONA CARE | मुंबईपाठोपाठ आता 'या' ठिकाणीही जमावबंदी

KONKAN CORORNA
KONKAN CORORNA

सिंधुदुर्ग - मुंबईनंतर आता कोकणातील महत्त्वाच्या मानल्या जाणा-या दोन जिल्ह्यांमध्ये जमावबंदी करण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमावबंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कोकणातील  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. 

मुंबईत रविवारी पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठं पाऊल उचलत 144 कलम लागू केलं होतं. दरम्यान आता मुंबई पाठोपाठ रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येते आहे.

आतापर्यंत कोरोनाचे 37 रुग्ण आढळून आले असून आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोकणात अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नसला, तरी लोकांना सतर्क राहण्याचं आणि काळजी करण्याचं आवाहन करण्यात केलं जातं आहे. तसंच ठिकठिकाणी जगजागृतीही केली जाते आहे. देशात तब्बल 112 रुग्ण आढळून आले आहेत. 

आतापर्यंत कुठे किती रुग्ण आढळले?

  • पुणे - 16
  • मुंबई - 8
  • नागपूर - 4
  • यवतमाळ - 2
  • रायगड - 1
  • कल्याण - 1
  • अहमदनगर- 1
  • ठाणे - 1
  • नवी मुंबई - 2

कोरोनाचा परिणाम पर्यटनावरही

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे कोकणातील हॉटेल व्यवसायावर आणि कोकणातील पर्यटनावर परिणाम झाला आहे. नेहमी रत्नागिरीतील समुद्र किनारे सुटीच्या दिवसांमध्ये पर्यटाकांनी गजबजलेले असतात. पण कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पर्यटकांची गजबज कमी झालीये....हॉटेल व्यवसायाला देखील कोरोनामुळे घरघर लागली आहे. बुकींग केलेले हॉटेल कॅन्सल केले जात आहेत. कोरोना व्हायरस जरी कोकणात नसला तरी त्याच्या परिणामामुळे कोकणचा आर्थिक कणा मात्र कोलमडू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 

पाहा व्हिडीओ - 

mumbai corona ratnagiri sindhudurg konkan covid 19 virus maharashtra patient in india

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com