साईभक्तांना नाही कोरोनाची चिंता! आदेश धुडकावत काढली परिक्रमा

गोविंद साळुंखे
रविवार, 15 मार्च 2020

आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना वायरसचा कहर पाहायला मिळाला असून तब्बल 31 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र शिर्डीत परिक्रमा काढणाऱ्या साईभक्तांना याची जराशीही चिंता वाटत नसल्याचं अधोरेखित झालंय.

शिर्डी - एकीकडे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले असताना शिर्डीत मात्र साईभक्तांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. शिर्डीत साईभक्तांनी परिक्रमा काढली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिर्डीताल परिक्रमा काढू नये असे आदेश प्रांत कार्यालय कडून देण्यात आले होते. मात्र तरीही हजारो ग्रामस्थांसह साईभक्तांनी परिक्रमा काढली आहे. प्रशासनाने दिलेल्या आदेशाला साई भक्तांनी केराची टोपली दाखवल्याचं पहायला मिळतंय. आता याच्यावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे पाहणं महत्वाचं असेल.

 

आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना वायरसचा कहर पाहायला मिळाला असून तब्बल 31 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र शिर्डीत परिक्रमा काढणाऱ्या साईभक्तांना याची जराशीही चिंता वाटत नसल्याचं अधोरेखित झालंय. एकीकडे राज्यातील तीर्थक्षेत्र कोरोनामुळे प्रभावित झाली आहे. अनेक ठिकाणी भाविकांना प्रवेश बंद करण्यात आलेत. तसंच महत्त्वाच्या यात्रादेखील रद्द करण्यात आल्या आहे. मात्र शिर्डीतील परिक्रमेच्या या प्रकारामुळे आरोग्याची चिंता न करता कोरोना वायरसला आमंत्रण साईभक्तांकडून दिलं जात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा फटका देवांच्या यात्रांनाही बसलाय.

 

 

कोरोनामुळे आतापर्यंत कोणकोणत्या यात्रा रद्द झाल्या?

  • कार्ला गडावरील श्री एकवीरा देवीची चैत्री यात्रा रद्द 
  • जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा रद्द 
  • खंडोबाची २३ मार्चला होणारी यात्राही रद्द 
  • पैठणची नाथषष्ठी यात्रा रद्द 
  • पैठणजवळची चितेगावची इज्तेमा बाबांची यात्रा
  • मांगीर बाबांचीही यात्रा रद्द 
  • येरमाळा येथील येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा रद्द 
  • काळाराम संस्थानच्या वासंतिक नवरात्रोत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द 
  • चंद्रपूरची देवी महाकालीची यात्रा कोरोनामुळे रद्द

 

पृथ्वीवर थैमान घालणाऱ्या कोरोनाचा फटका देवलोकांतून आलेल्या देवांच्या यात्रांनाही बसलाय. कोरोनामुळे भय इथले संपत नसताना ज्या देवाचा धावा करायचा त्याच्याशीच भक्तांची ऐन यात्रेलाच ताटातूट होतेय.

 

हेही वाचा - 30 दिवसांत कोरोनाला रोखलं नाही तर येणार मोठं संकट?

हेही वाचा - कोरोनाग्रस्त इराणमधून 234 भारतीय मायदेशी परतले

हेही वाचा - कोरोनाचा धोका टाळण्यासाठी हे करा

 

पाहा व्हिडीओ - जोतिबा चैत्र यात्रेला कोरोनाचा फटका

 

 

corona virus shirdi parikrama sai bhakt marathi maharahtra health


संबंधित बातम्या

Saam TV Live