कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषीत : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Hassan Mushrif
Hassan Mushrif

राज्यातील States  ग्रामीण भागातील Rural कोरोनामुक्तीच्या Corona कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका,Taluka जिल्हा District आणि संपूर्ण महाराष्ट्र Maharashtra राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची ग्रामविकास मंत्री Minister for Rural Development हसन मुश्रीफ Hassan Mushrif यांची घोषणा केली आहे. (Coronamukta village competition announced: Rural Development Minister Hasan Mushrif)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जनतेशी संवाद साधताना गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन  केले  आहे. 

हे देखील पहा - 

कोरोनामुक्त गावांना बक्षीसे कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50  लाख रुपये, 25 लाख रुपये व15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार.

6  महसुली विभागात प्रत्येकी 3 प्रमाणे राज्यात एकुण 18  बक्षीसे दिली जाणार. यासाठी बक्षीसाची एकुण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये असेल.

कोरोनामुक्त गावांना मिळणार विकासकामे

याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष पंचवीस – पंधरा (2515 ) व तीस-चोहोपन (3054)  या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50  लाख रुपये, 25 लाख रुपये व 15 लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार.

स्पर्धेत सहभागी गावांचे विविध 22 निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय आज जारी करण्यात येत आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावे. असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

Edited By - Puja Bonkile 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com