येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मृतावस्थेत आढळला बिबट्या

राजेश काटकर
शनिवार, 15 मे 2021

जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण पाणलोट क्षेत्रात एका बेटाच्या काठी एक बिबट्या काल रात्री मृतावस्थेत आढळून आला आहे. सायंकाळच्या सुमारास किन्ही गावाच्या परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या स्थानिकांना आली हा बिबट्या आढळून आला. 

परभणी : जिंतूर Jintur तालुक्यातील येलदरी धरण Yeldari Dam पाणलोट क्षेत्रात एका बेटाच्या काठी एक बिबट्या Leopard काल रात्री मृतावस्थेत Dead आढळून आला आहे. सायंकाळच्या सुमारास किन्ही गावाच्या परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या स्थानिकांना आली हा बिबट्या आढळून आला. Dead Leopard found In Catchment Area of ​​Yeldari Dam

किन्ही शिवारातील मत्स्यव्यवसाय करणारे नागरिक जलाशयात सायंकाळच्या सुमारास मासेमारी करत असताना पाण्यावर बिबट्या मृत अवस्थेत तरंगत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर या लोकांनी ही माहिती किन्ही गावचे सरपंच व पोलिस पाटील यांना कळवली. 

हे देखील पहा -

घटनेची माहिती वन विभागाचे अधिकारी आणि बामणी पोलिसांना देण्यात आली. प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी जयसिंग कच्छवे, वनपाल गणेश घुगे, वनपाल भंडारे, बामणी पोलिस ठाण्याचे पोलीस Police अधिकारी गव्हाणे,किन्हीचे सरपंच वाकळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. Dead Leopard found In Catchment Area of ​​Yeldari Dam

मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतरच त्याच्या मृत्युचे निश्चित कारण सांगता येईल असे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी जयसिंग कच्छवे यांनी सांगितले. दरम्यान या भागात मागे एक दोन वेळा बिबट्या दिसल्याचे अनेक नागरिकांचे दावे होते. 

पत्रकार आणि पोलीसांच्या सहकार्याने तब्बल सहा महिन्यानंतर अभिषेकला भेटली त्याची आई !

मात्र बिबट्या कधी वन विभागाच्या Forest Department हाती लागला नव्हता. यावेळेला मात्र बिबट्या मृतावस्थेत सापडल्याने या भागात पाण्याच्या ओढीने आणखी बिबट्याचे वास्तव्य असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live