जिगाव प्रकल्पाला 'भिमसागर प्रकल्प' असे नाव देण्याची प्रकल्पग्रस्तांची मागणी 

संजय जाधव
मंगळवार, 8 जून 2021

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील होऊ घातलेला महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'भिमसागर प्रकल्प जिगाव'असे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. 

बुलढाणा : बुलढाणा Buldhana जिल्ह्यातील नांदुरा Nandura तालुक्यातील होऊ घातलेला महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'भिमसागर प्रकल्प जिगाव'असे नाव देण्यात यावे अशी मागणी पुनर्वासित टाकळी या गावातील प्रकल्पग्रस्तांनी शासनाकडे केली आहे. Demand for naming Jigaon project as 'Bhimsagar Project'

नितीन गडकरी यांच्या नावाचा वापर करीत दोन भामटय़ांनी केली फसवणूक

विदर्भातील सर्वात मोठा प्रकल्प जिगाव Jigaon असून या प्रकल्पाचे Project  95 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात 46 गावांचे पुनर्वसन होत असून, तब्बल 13 हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प  आला आहे. 

हे देखील पहा -

या प्रकल्पाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर Dr.Babasaheb Ambedkar  यांचे देशातील योगदान समोर ठेऊन भिमसागर Bhimsagar प्रकल्प जिगाव असे नाव देण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणी चे निवेदन नांदुरा तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी शैलेश वाकोडे, अजय भिडे, संतोष तायडे, किशोर इंगळे, अरुण सुरवाडे, राहुल खंडेराव, पुरुषोत्तम भातूरकर, अमर पाटील आदी उपस्थित होते. 

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live