नितीन गडकरी यांच्या नावाचा वापर करीत दोन भामटय़ांनी केली फसवणूक

Dombivli
Dombivli

डोंबिवली : केंद्रीय मंत्री Minister नितीन गडकरी NItin Gadkari हे माझे भाऊ आहेत. आयकर विभाग जे सोने जप्त करतो ते कमी किंमतीत ओळखीने मिळवून देतो तुम्ही मला पाच लाख रुपये द्या, अशी बतावणी करीत एकाला पाच लाखांचा गंडा घातल्याच्या तक्रारीवरून राजन गडकरी आणि आनंद गडकरी या बाप-लेकाविरोधात विष्णूनगर पोलीस Police स्थानकात गुन्हा Case नोंद झाला आहे. Two Scoundrels Cheated Using Nitin Gadkari Name

अमोल पळसमकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल हे एका बँकेत लोन डिपार्टमेंटमध्ये कामाला आहेत. डोंबिवली Dombivli पश्चिमेकडील नेमाडे गल्ली सुमित्र कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या राजन गडकरी यांच्याशी त्यांची ज्योतिष पाहण्याच्या निमित्ताने जून २०१९ मध्ये ओळख झाली.

अमोल हे गडकरी यांच्या घरी गेले असता राजन आणि त्यांचा मुलगा आनंदने त्यांना आमचे स्टेशन जवळ सोन्याचे दुकान आहे. माझे भाऊ नितीन गडकरी हे मंत्री आहेत. आयकर विभाग जे सोने जप्त करतात ते कमी किमतीत तुम्हाला ओळखीवर मिळवून देतो. तुम्ही मला पाच लाख रुपये द्या, असे गडकरी पिता-पुत्रांनी पळसमकर यांना सांगितले.

त्यांच्यावर विश्वास ठेवून अमोल यांनी पाच लाखांचा चेक सुपूर्द केला. एक ते दोन महिन्यांत तुम्हाला तुमचे सोने मिळून जाईल, असे राजन यांनी सांगितले. परंतु दोन महिने उलटूनही सोने मिळाले नाही. गडकरी यांच्याकडे पैसे मागितले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.

त्यानंतर लॉकडाऊन लागल्याने अमोल गावी निघून गेले. २५ मे रोजी ते पुन्हा पैसे मागण्यासाठी गडकरी यांच्याघरी गेले असता त्यांचे कुटुंब घर सोडून गेल्याची माहिती शेजाऱ्यांकडून अमोल यांना मिळाली. अखेर आपली फसवणूक Fraud झाल्याचे लक्षात येताच अमोल यांनी विष्णूनगर पोलीस ठाणे गाठत गडकरी पिता-पुत्रां विरोधात तक्रार दाखल केली.

हे देखील पहा -

या दोघांनी काही जणांना नोकरीचे आमिष दाखवीत फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. मात्र या सर्व प्रकराबाबत पोलीसांनी हे कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे. तर आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत असेही पोलिसांचे म्हणणे आहे.

गडकरी कुटुंब बेपत्ता, सुनेची पोलीसात तक्रार...

राजन गडकरी , पत्नी अलका, मुलगा आनंद आणि नातू रुग्वेद, हे २४ मे पासून बेपत्ता झाल्याची तक्रार सून गीतांजली गडकरी यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. लहान मुलाला दवाखान्यात डोस देण्यास घेऊन जातो असे सांगून घराबाहेर पडले आणि ते आले नसल्याचे गीताजली यानी तक्रारीत म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com