"अन्नदान हेच श्रेष्ठदान" या संकल्पनेतून महिन्याभरापासून धुळ्यात जेवणाचे वाटप सुरू 

भूषण अहिरे
सोमवार, 31 मे 2021

कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कैलासवासी सिद्धार्थ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे "अन्नदान हेच श्रेष्ठदान" या संकल्पनेच्या माध्यमातून दोनवेळच्या जेवणाचे वाटप करण्यात येत आहे. 

धुळे - कोरोनाबाधित corona रुग्णांवर उपचार केले जात असलेल्या धुळे Dhule जिल्ह्यात हिरे वैद्यकीय महाविद्यालय  Medical College येथे कोरोना वर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्या रुग्णाच्या उपचारादरम्यान जेवणासाठी मोठी हेळसांड सहन करावी लागते. हेच लक्षात घेता कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कैलासवासी सिद्धार्थ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे Siddharth Agarwal Charitable Trust  "अन्नदान हेच श्रेष्ठदान" या संकल्पनेच्या माध्यमातून दोनवेळच्या जेवणाचे वाटप करण्यात येत आहे. The distribution of food in Dhule has been going on

हे देखील पहा - 

रुग्णालयाच्या बाहेर या संघटनेमार्फत रिक्षामध्ये किंवा इतर विविध वाहनांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवणाचे पॅकेट आणले जातात व रुग्णांच्या नातेवाईकांना संघटनेच्या कार्यकर्त्यांमार्फत त्याचे वाटप केले जाते.गेल्या महिनाभरापासून निस्वार्थी भावनेने या संघटनेतर्फे कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना अहोरात्र जेवणाचे पॅकेट वाटप केले जात आहेत. The distribution of food in Dhule has been going on

क्रिकेट कारकिर्दीत पहिल्या 6 वर्षात फक्त 1 धाव; नंतर बनला 'कर्णधार'

कैलासवासी सिद्धार्थ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या "अन्नदान हेच श्रेष्ठदान" या संकल्पनेतून रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे वाटप केले जात असल्यामुळे गेल्या महिनाभरापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा या संस्थेमार्फत मिळाला आहे.यापुढे देखील अशाच पद्धतीने रुग्णांच्या नातेवाईकांची अहोरात्र सेवा संस्थेमार्फत केली जाणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live